NAAC Rating esakal
महाराष्ट्र बातम्या

NAAC : राज्यातील २ हजार १४१ पैकी फक्त २५७ महाविद्यालयांनी प्राप्त केले नॅक मानांकन

नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रकारच्या महाविद्यालयांचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे.

सम्राट कदम

पुणे - नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रकारच्या महाविद्यालयांचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. मात्र राज्यातील दोन हजार १४१ विना अनुदानित महाविद्यालयांपैकी फक्त २५७ महाविद्यालयांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेचे (नॅक) मानांकन प्राप्त केले आहे. उर्वरित महाविद्यालयांनी कमालीची उदासीनता दाखवली आहे.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या विभागीय संचालकांच्या आढावा बैठकीत ही माहिती समोर आली आहे. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आदी उपस्थित होते. यावेळी विद्यापीठनिहाय संलग्न महाविद्यालये, त्यापैकी नॅक मानांकन प्राप्त महाविद्यालये यांची माहिती व आढावा घेण्यात आला.

तर महाविद्यालयांतील प्रवेश थांबवा

नॅक मानांकनासाठी नोंदणी केलेल्या, मानांकन प्राप्त झालेल्या व मानांकन नसलेल्या महाविद्यालयांची माहिती, नावे आदी विद्यापीठांनी आपल्या संकेतस्थळावर अद्ययावत करून प्रसिद्ध करावी. मानांकन न घेतलेल्या महाविद्यालयांना ही प्रक्रिया करण्यासाठी नोटीस द्याव्यात.

विहित कालमर्यादेत कार्यवाही न केलेल्या महाविद्यालयांना पुढील काळात नवीन प्रवेश थांबविणे, प्रवेश संख्या कमी, मर्यादित करणे तसेच त्यांची परीक्षा केंद्रे रद्द करणे अशी कार्यवाही विद्यापीठ कायद्यानुसार तसेच विविध नियम तरतुदी लक्षात घेऊन करावी, असे आदेश चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले. तसेच तंत्र शिक्षण, औषध निर्माण शास्त्राचे पदविका शिक्षण देणाऱ्या संस्थांनी राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळाकडून (एनबीए) मूल्यांकन करून घेणे आवश्यक असून, त्यासाठी तंत्रशिक्षण विभागाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नॅक मूल्यांकन

प्रकार - एकूण महाविद्यालये - नॅक मूल्यांकन पूर्ण करणारे

- अनुदानित - १,१७७ - १,११३

- विनाअनुदानित - २,१४१ - २५७

- शासकीय - २८ - २४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT