Inflation  Sakal
महाराष्ट्र बातम्या

सामान्य जनतेला महागाईचे चटके

किरकोळ महागाई निर्देशांकात वाढ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अन्नपदार्थ आणि पेयांच्या किंमतीमध्ये, तसेच इंधनाच्या दरांत झालेल्या वाढीचा परिणाम म्हणून सामान्य जनतेला महागाईचे चटके बसत असल्याचे चित्र आहे. मार्च महिन्यातील देशातील ग्राहक किंमत निर्देशांक १७ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर म्हणजे ६.९५ टक्क्यांवर गेला आहे. फेब्रुवारी महिन्यात हाच दर ६.०७ टक्के होता.

केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ही आकडेवारी प्रसिद्धीस दिली आहे. मार्च महिन्यातील चलनवाढ ६.३५ टक्के राहील असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला होता. मात्र प्रत्यक्षातील चलनवाढ त्याहीपेक्षा जास्त झाली आहे. चलनवाढीचा दर सहा टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याचा हा सलग तिसरा महिना आहे. एप्रिल ते जून महिन्यांमधील चलनवाढ ६.३ टक्के राहील असा अंदाज रिझर्व बँकेने नुकताच वर्तवला आहे. अन्न निर्देशांकाबरोबरच सामिष आहार, तेल, भाज्या, कपडे आणि पादत्राणे, इंधन अशा सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे चलनवाढीचा दरही फुगला आहे.

अन्नधान्याच्या महागाईचा दर फेब्रुवारीमधील ५.८५ टक्क्यांवरून मार्च महिन्यात ७.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सलग तीन महिने महागाईचा दर वाढतच आहे. किरकोळ महागाई नियंत्रणात ठेवण्याला रिझर्व्ह बँकेचे प्रथम प्राधान्य असते. त्यामुळे नुकत्याच जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणातही महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रमुख व्याजदरात बदल करण्यात आलेला नाही. महागाईचा दर २ ते ६ टक्क्यांच्या आत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना सरकारने रिझर्व्ह बँकेला दिल्या आहेत.

एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ मधील एकत्रित औद्योगिक उत्पादनवाढ साडे बारा टक्के आहे. एक वर्षापूर्वीच्या याच कालखंडात त्यात ११.१ टक्के घट होती. अकरा महिन्यांच्या कालखंडात उत्पादन क्षेत्राची वाढ १२.९ टक्के झाली, तर मागील अकरा महिन्यांच्या काळात त्यात १२.५ टक्के घट झाली होती. देशातील आठ प्रमुख क्षेत्रांमधील उत्पादन मागील फेब्रुवारीपेक्षा या फेब्रुवारीत ५.८ टक्के वाढले होते, जानेवारीत हीच वाढ चार टक्के होती. या फेब्रुवारीत खाणक्षेत्राचे उत्पादन गेल्या फेब्रुवारीपेक्षा ४.५ टक्के वाढले, जानेवारीतील वाढ २.८ टक्के होती. तर फेब्रुवारीत वीजनिर्मिती गेल्यावर्षीपेक्षा ४.९ टक्क्यांनी वाढली, जानेवारीतील वाढ फक्त ०.९ टक्के होती.

औद्योगिक उत्पादनात १.७ टक्के वाढ

नवी दिल्लीखाण क्षेत्रातील उत्पादन वाढल्यामुळे तसेच वीजनिर्मितीत वाढ झाल्यामुळे फेब्रुवारी महिन्यातील देशाच्या औद्योगिक उत्पादनात १.७ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. जानेवारीत हे उत्पादन दीड टक्का वाढले होते. फेब्रुवारीमधील उत्पादन क्षेत्रातही ०.८ टक्के वाढ नोंदविली गेली आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांक मागच्या वर्षीच्या फेब्रुवारी ३.२ टक्‍क्‍यांनी घसरला होता. मात्र यावर्षी त्यात वाढ झाल्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

ग्राहक किंमत निर्देशांक (मार्च २०२२)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT