solapur police sakal
महाराष्ट्र बातम्या

पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडेची माहिती! एमडी ड्रगप्रकरणी आंतरराज्य टोळीच्या मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक; गँगवर मोक्कांतर्गत कारवाई करणार

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एमडी ड्रग तयार करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक केली आहे. दोघांनाही २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. मुख्य सूत्रधार फय्याज अहमद रसूल शेख (वय ५२, रा. बी २०, स्वीट सहारा अपार्टमेंट, राखेआळी रोड, जी. जी. कॉलेज रोड, वसई, जि. पालघर), रमेश नरसिंह आयथा (वय ४२, रा. गणेश नगर, बस स्टँड, मौलाअली, मलकजगिरी, हैदराबाद) अशी कोठडीतील संशयितांची नावे असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी बुधवारी (ता. २१) पत्रकार परिषदेत दिली.

१७ ऑक्टोबर रोजी ग्रामीण पोलिसांनी पुणे महामार्गावरील देवडीपाटी (ता. मोहोळ) येथील हॉटेल श्री साईसमोर दोघांना अटक करीत सहा कोटी दोन लाखांचा तीन किलो १० ग्रॅम ड्रग जप्त केला होता. याप्रकरणी मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. संशयित हे चंद्रमौळी व चिंचोळी एमआयडीसीत ड्रग तयार करीत असल्याचे तपासात आढळून आले होते. त्यानुसार ते कारखाने पोलिसांनी सील केले होते.

या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार फय्याज हा कर्नाटकातील कलबुर्गी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार १४ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथील लुंबिनी ग्रँड हॉटेल परिसरात सापळा रचून त्याला पकडले. तपासात त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पथकाने १६ फेब्रुवारी रोजी त्याचा साथीदार रमेश आयथा याला हैदराबादेतून ताब्यात घेतले. दोघांनाही येथील विशेष न्यायालयाने २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे, फौजदार सुरज निंबाळकर, राजेश गायकवाड, सहाय्यक फौजदार श्रीकांत गायकवाड, हेडकॉन्‍स्टेबल सलीम बागवान, विजयकुमार भरले, नाईक दीपाली जाधव, कॉन्स्टेबल अन्वर अत्तार, विनायक घोरपडे, अक्षय डोंगरे, समर्थ गाजरे, यश देवकते, सायबरचे अभिजित पेठे, व्यंकटेश मोरे, महादेव काकडे यांनी ही कारवाई केली.

एकूण १३ अटकेत, चौघांचा शोध सुरू

पोलिसांनी देवडी फाट्याजवळ दत्तात्रय व गणेश घोडके यांना पकडून ड्रग जप्त केले होते. त्यानंतर ग्रामीण, स्थानिक व मोहोळ पोलिसांनी उत्तर भारतातील प्रयागराज, रिवा, दक्षिण भारतातील चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद व तेलंगणात शोध घेतला. मध्यप्रदेशातील बरगढ (जि. चित्रकुट), कर्नाटकातील बीदर, तेलंगणातील जहिराबाद येथून संशयितांना अटक केली आहे. सूत्रधारासह दोघांना अटकेनंतर एकूण संशयितांची संख्या १३ झाली आहे. त्यांच्याकडून आठ कोटी ८२ लाख ९९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात एमडी ड्रगसह, त्यासाठीचा कच्चा माल, वाहने, मोबाईलचा समावेश आहे. तर पोलिसांकडून आणखी चौघा संशयितांचा शोध सुरू आहे. यात मुख्य सूत्रधार फय्याजच्या नातेवाईकांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

टोळीचा बीमोड करण्यासाठी कारवाई

संशयित हे गुन्ह्यातून सुटल्यावर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी ड्रग निर्मिती करतात. त्यामुळे या टोळीचा बीमोड करण्यासाठी या गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी सांगितले.

नागरी वसाहतीकडे मोर्चा, सावध राहा

ड्रग माफिया हे औद्योगिक वसाहतीत दुर्लक्षित जागी व बंद पडलेले कारखाने भाड्याने घेऊन ड्रग निर्मिती करायचे. आता त्यांचा भांडाफोड झाल्यानंतर पोलिसांनी औद्योगिक वसाहतींवर लक्ष केंद्रित केल्याने त्यांनी नागरी वसाहतीकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळे नागरिकांनी सजग रहावे. संशयास्पद आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी केले.

...त्यानंतर कारखाना मालकांवर कारवाई

ड्रग आढळल्यानंतर चिंचोळी व चंद्रमौळी एमआयडीसीत पाच पथकांच्या माध्यमातून दीड महिने तपासणी मोहीम राबविण्यात आली. जेथे ड्रग आढळले त्या कारखान्यांविषयीची कागदपत्रे, माहिती एमआयडीसीकडे मागितली आहेत. ती मिळाल्यानंतर यात मालकांचा सहभाग आहे का, यासह विविध बाबींचा विचार करुन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत ठरेल. तसेच या गुन्‍ह्यातील एका कारखान्याचा भाडेकरार संशयिताच्या तर दुसरा अन्य व्यक्तीच्या नावे होता, असे पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Political Crisis: अजित पवारांना नवीन चिन्ह मिळणार? सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण मेन्शन, 'या' तारखेला सुनावणी

Big Billion Days : खुशखबर! नथिंग 5G फोन मिळतोय 12,999 रुपयांत; एकदम ब्रँड फीचर्सच्या स्मार्टफोनवर महा डिस्काऊंट

Jalgaon Accident News : ट्रकला दुचाकी धडकल्याने बापलेकाचा मृत्यू; पत्नी गंभीर

Ganpati Visarjan : गणपती विसर्जन मिरवणुकीत दगडफेकीप्रकरणी 30 जणांना अटक; इमामनगरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

SCROLL FOR NEXT