Accident News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Accident News: दोरखंड लावला अन् मोबाईल टॉर्चच्या उजेडात जखमींना वर काढलं, कन्नड घाटातील अपघातात चार भाविक ठार

कन्नड औट्रम घाटात तिनशे फुट दरीत कार कोसळून चार भाविक ठार, सात जण गंभीर जखमी झाले, पडत्या पावसात तिन बचाव पथकांनी पाच तास अथक परिश्रम करून सात जखमीं व चार मृतदेह आणले वर

सकाळ वृत्तसेवा

कन्नड ता.२७( बातमीदार) सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड औट्रम घाटात सोमवारी (ता.२७) पावणे दोन वाजता अक्कलकोट येथून देवदर्शन करून परतणारी तवेरा कार (क्रमांक एम एच ४१व्ही ४८१६) तीनशे फूट खोल दरीत कोसळली.या अपघातात चार जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू व जखमी जानेवाडी , मालेगाव येथील रहिवासी आहेत.

बचाव पथकात राष्ट्रीय महामार्ग पोलिस, चाळीसगाव शहर, ग्रामीण पोलीस या तीन पथकांनी व स्थानिक प्रवाशांनी रात्री सव्वादोन वाजता मदतकार्यास सुरवात केली.सकाळी सात वाजेपर्यंत मदत कार्य चालले. त्यातच घाटातील मेणबत्ती पॉईंटवर दरड कोसळली. मोठाले दगड,माती रस्त्यावर पडून रस्ता बंद झाला.त्यामुळे जखमींना रुग्णालयापर्यंत पोहचविण्यात अडथळे निर्माण झाले. हे दगड,माती हटविण्यासाठी या पथकाने शर्थ केली. अक्षरशः हातांनी व फावड्याने दगड माती हटविण्यात आले.पाऊस,धुके आणि अंधार यामुळे मदत कार्य जिकरीचे व आव्हानात्मक झाले.

तिनशे फुट खोल दरीतून चार मृत्यू देह व सात जखमींना दोरखंड लावून, मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात वर काढण्यात आले.

अक्कलकोट येथून देवदर्शन करून तवेरा कारने मालेगाव येथे परतत असताना पाऊस,धुके असल्याने कारचाकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने व तुटलेल्या कठड्यामुळे कार दरीत कोसळली. घाटातील जय मल्हार पॉंईंट,जुना लाकडी पुल येथे अपघात झाला.

मृतांमध्ये प्रकाश गुलाबराव शिर्के (वय 65) शिलाबाई प्रकाश शिर्के (वय ६०) वैशाली धर्मेंद्र सूर्यवंशी (वय ३५) ,पूर्वा गणेश देशमुख (वय-८ )यांचा समावेश आहे. जखमींमध्ये अनुज धर्मेंद्र सूर्यवंशी (वय-२०) जयेश धर्मेंद्र सूर्यवंशी (वय 17 ) सिद्धेश पुरुषोत्तम पवार (वय -१२) कृष्णा वासुदेव शिर्के (वय -४), रूपाली गणेश देशमुख (वय- 30 )पुष्पा पुरुषोत्तम पवार( वय -35) व वाहन चालक अभय पोपटराव जैन (वय ५०)पन्नास यांचा समावेश आहे.

अपघात झाल्यानंतर जखमी अनुष धर्मेंद्र सूर्यवंशी हा तिनशे फूट दरीतून वर आला व त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना मदतीसाठी याचना केली. काही प्रवाशांनी चाळीसगाव शहर व ग्रामीण पोलिसांचे संपर्क साधला. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग पोलीस पथक चाळीसगाव ग्रामीण व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

ग्रामीण शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली पाटील ,वीरेंद्र शिसोदे ,गणेश काळे, जितेंद्र माळी, ललित महाजन, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरवडे, संदीप पाटील ,नाना बडगुजर, युवराज नाईक, संदीप माने, मनोज पाटील, बाबा राजपूत,नितीन वाल्हे, वीरेंद्र राजपूत, राजेंद्र साळुंखे, शंकर जंजाळे, नंदू परदेशी, राहुल सोनवणे आदींसह राष्ट्रीय महामार्ग पोलिस,चाळीसगाव शहर ग्रामीण पोलीस ठाण्याचे मदत पथक तसेच स्थानिक प्रवाशांनी अपघातग्रस्तांना खोल दरीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली.

जखमींना चाळीसगाव येथे अॕम्बुलन्स द्वारे रुग्णालयात पोहचविण्यात आले.

न्यायालयाने सततच्या वाहतूक कोंडीमुळे औट्रम घाट जड वाहतुकीसाठी बंद केला आहे.त्यामुळे हा घाट सुनसान झाला आहे.पुर्वी या घाटातून मोठी वाहतूक असल्याने अपघात झाल्यानंतर तत्काळ माहिती मिळत होती. आता फक्त खाजगी प्रवाशी छोटी वाहने या रस्त्यावरून येणेजाणे करत असल्याने काही अनुचित घटना घडली तर कोणाच्या लक्षात येत नाही.तसेच कन्नड व चाळीसगाव नाक्यावरील पोलीस नाका बंद करण्यात आला आहे.

सदर अपघाताची चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाला.परंतू औट्रम घाटातील भूयारी मार्ग तयार केला नाही,हे अतार्किक आहे.केंद्रीय सडक मंत्री नितीन गडकरी यांना या प्रश्नी चर्चा करण्यासाठी संपर्क साधला परंतू ते वेळ देत नाही, विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत, भाजपचे विधानसभा प्रमुख डॉ.संजय गव्हाणे यांना या प्रश्नाचे गांभीर्य नाही, दररोज घाटात अपघात होत आहे,या प्रश्नी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी आमदार नितीन पाटील यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole: काँग्रेससाठी उद्या निर्णायक दिवस; दिल्लीतल्या CECच्या बैठकीनंतर नाना पटोले स्पष्टच बोलले

IND A vs AFG A : अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांना बदड बदड बदडले... ट्वेंटी-२०त दोनशेपार पोहोचले

IND vs NZ: 'Virat Kohli जर देशांतर्गत सामना खेळला असता तर...'; दुसऱ्या कसोटीतील अपयशानंतर अनिल कुंबळे स्पष्टच बोलला

MNS Candidates List: एकेकाळी विश्वासू सहकारी असलेल्या धंगेकरांविरोधात राज ठाकरेंनी दिला 'हा' उमेदवार

Latest Maharashtra News Updates Live : पक्षाने दिलेल्या उमेदवाराचं काम करणार- सुधीर साळवी

SCROLL FOR NEXT