neel somaiya-kirit somaiya Sakal
महाराष्ट्र बातम्या

INS Vikrant Case: राजभवनाच्या खात्यात पैसे जमा करण्यास गेलो मात्र...

किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अटक पूर्व जामीन अर्जावर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पूर्ण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अटक पूर्व जामीन अर्जावर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, गोळा करण्यात आलेला निधी आम्ही पैसे राजभवनाच्या खात्यामध्ये जमा करण्यास गेलो होतो मात्र, बँकेमध्ये राजभवनाच्या नावाने कोणतेही खाते नसल्यान हे पैसे पक्षाला देण्यात आल्याचा युक्तीवीद किरीट सोमय्या यांच्या वकीलांनी न्यायालयात केला आहे. तर दुसरीकडे आर्थिक गुन्हे शाखेने किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीनाला विरोध केला आहे.

संबधित घटना 2013 सालची असून, ज्यावेळी विक्रांत युद्धनौका वाचवण्याची मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत राज्य सरकार आणि मुंबई महापालिका सहभागी असल्याचेदेखील न्यायालयात सांगण्यात आले. तसेच तक्रारदारांनी दिलेली तक्रार ही प्रसार माध्यमातून मिळालेल्या माहितीवर आधारित असून, आर्थिक गुन्हे शाखेने या अटकपूर्व जामीनाला विरोध केला आहे.

२०१३ च्या घटनेची आताच का दखल घेतवी जात असे सांगत, विक्रांतसाठी शिवसेनेनेही पैसे जमा केल्याचे सोमय्यांच्या वकीलांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे या प्रकरणात शिवसेनेलादेखील आरोपी करण्याचा युक्तीवाद करण्यात आला आहे. तर तक्रारीत किरीट सोमय्या यांनी विश्वास संपादन करून हे पैसे गोळा करून फसवणूक केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच ही रक्कम राज्यपालांकडे जमा न करता स्वत:चा फायदा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पैशांचा वापर केला कुठे ?

सोमय्या हे एका राजकीय पार्टीचे नेते आहेत. त्यांनी त्या पैशांचा वापर मग केला कुठे? ही रक्कम INS विक्रांतसाठी वापरण्यात येईल या अनुषंगाने जमा केली होती. पण ही रक्कम इतर कामासाठी वापरली गेली असेल तर हा कायदेशीर गुन्हा होतो असा युक्तीवाद न्यायालयात सरकारी वकीलांकडून करण्यात आला आहे. विक्रांतला वाचवण्यासाठी कुठुनही पैसे आले असतेच पण महापालिका आणि इतर माध्यमांनीही युद्ध नौका वाचवण्यासाठी मदत करायची घोषणा केली होती मात्र पैसेच आले नाहीत.

पण सोमय्या हे विक्रांतसाठी जमा केलेले पैसे राजभवन येथे देणार होते. तशा बातम्याही छापून आल्या होत्या. पण विक्रांत वाचवण्यासाठी राजभवनात कुठलेही खाते नसल्याचं सोमय्या यांच्या वकिलांनी न्यायालयात सागितलं. तसंच भूक लागलेल्या माणसाने चोरी करावी मात्र परिस्थितीचा फायदा घेऊन लोकांचा विश्वास घात करू नये. विक्रांतसाठी जमा केलेले पैसे गेले कुठे याचा शोध लागणं गरजेचं असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील प्रदीप घरत यांनी करत सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीनाला जोरदार विरोध केला आहे. तसंच याला प्रत्युत्तर देताना, आम्ही पैसे द्यायला गेलो होतो, मात्र खातं नसल्यामुळे आम्ही ते पैसे पार्टीला दिले असं सोमय्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT