NCP Ajit Pawar on taking over Chief Minister post from Eknath Shinde Devendra fadnavis chandni chowk flyover inauguration  
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : मुख्यमंत्र्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सद्भावना दिवस प्रतिज्ञा, 'हे' आहे कारण

सकाळ डिजिटल टीम

Ajit pawar attend programe

Mumbai News - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेतली आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार होते, पण, शिंदेंऐवजी अजित पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रम आटोपण्यात आला आहे. माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजनात कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सद्भावना दिवस प्रतिज्ञेसाठी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमुळे उपमुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम घेतला. सद्भावना दिनाच्या निमित्ताने अजित पवारांनी प्रतिज्ञा वाचन केली. अजित पवार, दादा भुसे आणि शंभुराजे देसाई आणि दिपक केसरकर यांनी यावेळी प्रतिज्ञा घेतली.

शासनाच्या परिपत्रकान्वये दिनांक २० ऑगस्ट, २०२३ रोज सद्भावना दिवस प्रतिज्ञा घ्यायची असते. स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात येतो. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवत असतात.

युवा कल्याण आणि क्रिडा मंत्रालय, भारत सरकार यांनी अ.क्र. २ येथील दिनांक १०/०८/२३ च्या परिपत्रकान्वये रविवार, दिनांक २० ऑगस्ट २०२३ ऐवजी शुक्रवारी दिनांक १८ ऑगस्ट २०२३ रोजी सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नाही. काही दिवस ते साताऱ्याला आपल्या गावी आराम करण्यासाठीही गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचे कार्य सांभाळत असल्याचं दिसत आहे. शिवाय, अजित पवार यांना मुख्यमंत्री केली जाणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे अशा काही घटना घडल्या की लोकांच्या भुवया उंचावत आहेत. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT