Gose Khurd Dam Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता

राज्यात गेल्या आठवडाभरापेक्षा जास्त दिवसांपासून पाऊस दमदार हजेरी लावत आहे. मात्र, पुढील तीन ते चार दिवसात पावसाचा जोर कमी होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यात गेल्या आठवडाभरापेक्षा जास्त दिवसांपासून पाऊस दमदार हजेरी लावत आहे. मात्र, पुढील तीन ते चार दिवसात पावसाचा जोर कमी होणार आहे. दरम्यान शुक्रवारी (ता. १५) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

राज्यात गुरुवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. दक्षिणेकडे असलेला मॉन्सूनचा आस, राज्याच्या मध्यभागावर पूर्व-पश्‍चिम दिशेने वाहणारे परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र या प्रणाली सक्रिय आहेत. तसेच अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात जोरदार पाऊस पडत होता. त्यातच आता मॉन्सूनचा आस उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून पूर्व किनाऱ्यालगत असलेल्या कमी दाबाचे क्षेत्र ओसरण्याची चिन्हे आहेत. परिणामी, पुढील तीन-चार दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज आहे.

येथे पावसाचा धुमाकूळ

उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह धरणक्षेत्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथ्यावरील शिरगाव येथे सर्वाधिक ३१२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मराठवाड्यातही पावसाचे धुमशान सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पूर्व विदर्भातही पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. पालघर, जव्हारसह मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरीवर सरी सुरूच आहेत. नद्या, नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत असून, अनेक ठिकाणी २०० मिलिमीटर पेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, पुणे, सातारा, जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर अधिक आहे.

हवामानाची सद्य-स्थिती -

- पूर्व किनाऱ्यावरील ठळक कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता ओसरून उत्तर ओडिशा आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र

- या प्रणालीला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय

- गुजरातजवळ आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासांमध्ये तयार होण्याची शक्यता

- मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकण्याचा अंदाज

हवामानाचा अंदाज काय सांगतो -

- येत्या सोमवारपासून (ता. १८) राज्यात पावसाची काहीशी उघडीप अपेक्षित

- धरण क्षेत्रात सततची पाणी आवक मात्र कायम राहण्याची शक्यता

- शुक्रवारी (ता. १५) पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, पालघर येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट

गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथा आणि धरणक्षेत्रातील पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये) -

  • लोणावळा (टाटा)- २१८

  • लोणावळा (कार्यालय) - २३८

  • शिरगाव - ३१२

  • अम्बोणे - २३२

  • दावडी - २६३

  • वैतरणा - २४२

  • तानसा - २२१

  • ताम्हिणी - २३५

  • खंद - २५३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात घसरण कायम राहणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Latest Marathi News Updates live : नवाब मलिक यांच्या जावयाच्या मृत्यूनंतर चालकावर गुन्ह्यात वाढ

Kolhapur Elections : दक्षिण, उत्तर, इचलकरंजी, कागल, शाहूवाडीत दुरंगी लढती; राधानगरी, चंदगडमध्ये बंडखोर जोरात

Nagpur Crime: मृतदेहाला केमिकल लावण्यासाठी मागितले पैसे; नागपूरध्ये धक्कादायक प्रकार

Eknath Shinde: आघाडी सरकारने अडीच वर्षांत काय केले? होऊन जाऊ द्या "दूध का दूध पानी का पानी"

SCROLL FOR NEXT