zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

स्वजिल्ह्यात जाण्यासाठी आंतरजिल्हा बदलीतील शिक्षकांना अजूनही ‘थांबा’च! नवीन भरतीतील शिक्षकांनाही पदस्थापना नाही; 'अतिरिक्त'चे समायोजनही रखडलेलेच

राज्यातील 2319 शिक्षक आंतरजिल्हा बदलीस पात्र ठरले, पण, लोकसभा निवडणुकीमुळे त्यांची कार्यमुक्ती रखडली आहे. नवीन शिक्षक भरतीमुळे त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. या शिक्षकांना स्वत:च्या जिल्ह्यात येण्यासाठी आचारसंहिता संपेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील दोन हजार ३१९ शिक्षक आंतरजिल्हा बदलीस पात्र ठरले, पण, आता लोकसभा निवडणुकीमुळे त्यांची कार्यमुक्ती रखडली आहे. सुरवातीला नवीन शिक्षक भरतीमुळे त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. या शिक्षकांना स्वत:च्या जिल्ह्यात येण्यासाठी निवडणुकीची आचारसंहिता संपेपर्यंत आहे त्याच ठिकाणी थांबावे लागणार आहे.

शिक्षक भरती झाल्यापासून स्वत:च्या कुटुंबापासून (आई-वडील) दूर परजिल्ह्यात नोकरी करणाऱ्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीतून ठरावीक वर्षांनतर स्वजिल्ह्यात येण्याची संधी मिळाली. ऑनलाइन पद्धतीने ग्रामविकास विभागातर्फे ही बदली प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वी पार पडली. मात्र, नवीन शिक्षक भरती सुरू झाल्याने त्यांची कार्यमुक्ती रखडली.

शिक्षक भरतीनंतर लगेचच कार्यमुक्तीचे आदेश निघतील, अशी त्यांना आशा होती. परंतु, आता लोकसभा निवडणुकीमुळे पुन्हा त्यांना थांबावेच लागणार आहे. आता नव्याने भरती झालेल्यांना सेवानिवृत्त होईपर्यंत एकाच जिल्ह्यात काम करावे लागणार असून त्यांची आंतरजिल्हा बदली होणार नाही. शेवटच्या आंतरजिल्हा बदलीतून स्वजिल्ह्यात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल, या आशेवरील शिक्षकांना कधीपर्यंत कार्यमुक्तीचे आदेश मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवीन शिक्षकांच्या नेमणुकाही लांबणीवर

नवीन शिक्षक भरती झाल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेला २७३ शिक्षक मिळाले. सुरवातीला त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी युद्धपातळीवर करण्यात आली. पण, समांतर आरक्षणातील नवनियुक्त शिक्षकांच्या आरक्षणाची पडताळणी, पोलिसांकडील चारित्र्य पडताळणीचा दाखला, फिटनेस प्रमाणपत्र अशा कागदपत्रांची अद्याप पडताळणी बाकी आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांचे समुपदेशन होईल आणि त्यानंतर त्यांना संबंधित शाळांवर पदस्थापना दिली जाणार आहे. लोकसभा आचारसंहितेमुळे या नवीन शिक्षकांना पदस्थापनेसाठी तीन महिने वाट पाहावी लागणार आहे.

आंतरजिल्हा बदलीतून ८२ शिक्षक येणार

आंतरजिल्हा बदलीतून सोलापूर जिल्हा परिषदेला ८२ शिक्षक मिळणार आहेत. पण, कार्यमुक्तीचे आदेश नसल्याने ते अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे तत्पूर्वी नव्याने भरती झालेल्यांची समुपदेशनाद्वारे पदस्थापना होईल. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल आणि आंतरजिल्हा बदलीतून आलेल्या शिक्षकांना पुन्हा ज्या शाळांमध्ये पदे रिक्त आहेत, त्याठिकाणी नेमणुका मिळतील अशी सद्य:स्थिती आहे. त्यामुळे स्वजिल्ह्यात येऊनही त्यांना सोयीच्या ठिकाणी पदस्थापना मिळेल की नाही, याबाबत शंका कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT