देशातील ‘काळा’ पैसा बाहेर आणणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आयकर विभाग छापा टाकण्याची कारवाई करत असते. त्यामूळे काळजी घ्या आयकर भरा असे सरकारी जाहीराती वेळोवेळी सांगत असतात. ज्या लोकांकडे काळे पैसे आहेत त्यांना काळजी करण्याची गरज, आम्हाला नाही. असा विचार करत असाल तर थांबा. कारण, आयकर विभागाची कारवाई रोज कुठे ना कुठे सुरू आहे. ते कधी मोठ्या व्यापाऱ्यांना पकडतात. तर कधी एखाद्या ड्रायव्हरला. त्यामूळे आयकर विभागाची धाड तूमच्याही घरावर पडू शकते.
आज आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन आहे. त्यानिमित्ताने आयकर विभागाच्या जाचाला सामोरे जायचे नसेल तर काय काळजी घेतली पाहिजे ते पाहुयात.
भारताच्या केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या आयकर विभाग आणि ‘सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस अँड द डायरेक्टरेट ऑफ इन्फोर्समेंट (ईडी) या दोन संस्था कोणती व्यक्ती कंपनी कर भरत नाहीये याची सतत पाहणी करत असते. एखादया व्यक्तीने भरलेला कर आणि त्याचे खरे उत्पन्न हे देखील या संस्थांच्या नजरेतून चुकत नसते. या दोन्ही संस्थांनी प्रत्येक क्षेत्रात आपले काही गुप्तहेर नेमलेले असतात जे की त्यांना कर चुकवणाऱ्या किंवा केवळ रोख व्यवहार करणाऱ्या, उत्पन्नापेक्षा अधिक खर्च करणाऱ्या, अघोषित पैसे किंवा दागिने असलेल्या लोकांची माहिती देत असतात.
अतिरिक्त किंवा बेहिशोबी मालमत्ता असलेल्या ठिकाणावर धाड टाकण्याची परवानगी ही आयकर विभागाला असते. ही धाड कोणत्या वेळेस टाकावी? आणि ती किती दिवस चालावी? याचं पूर्ण स्वातंत्र्य आयकर विभागातील अधिकाऱ्यांकडे असते. आज सर्वांच्या परिचीत झालेल्या ईडीकडे पॅन कार्ड असलेल्या पण आयटी रिटर्न न भरणाऱ्या फॉर्म १६ नसलेल्या आशा संशयित व्यक्तींची यादी ठराविक अंतराने पोहोचत असते.
घरी किती सोने ठेऊ शकतो
देशातील पहिला सुवर्ण नियंत्रण कायदा १९६८ होता, ज्यामध्ये ठराविक रकमेपेक्षा जास्त सोने ठेवण्यावर नजर ठेवण्यात येते. परंतु जून १९९० मध्ये ते रद्द करण्यात आले. परंतु सध्या सोने घरी ठेवण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही, जर तुम्ही त्याचा वैध स्त्रोत आणि पुरावा द्यावा लागेल. सरकारी नियमांनुसार विवाहित महिला ५०० ग्रॅम सोने ठेवू शकते, तर अविवाहित महिला २५० ग्रॅम आणि विवाहित पुरुष १०० ग्रॅम सोने ठेवू शकतो. तसेच यासाठी संबंधित व्यक्तीला उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज भासणार नाही आणि या मर्यादेत कोणी सोने ठेवल्यास आयकर विभाग सोने जप्त करणार नाही.
वारसाहक्काने आलेले सोने
प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम १३२ नुसार प्राप्तिकर अधिकाऱ्यांना मर्यादेपेक्षा जास्त दागिने जप्त करण्याचा अधिकार आहे. याशिवाय ५० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे सोन्याचे दागिने भेटवस्तूमध्ये आढळल्यास किंवा दागिने वारसाहक्कामध्ये आढळल्यास ते कराच्या कक्षेत येत नाहीत. पण ती भेटवस्तू आहे की वारसाहक्काने आहे हे सिद्ध करावे लागेल.
घरी किती रक्कम ठेऊ शकतो
घरी रोख ठेवण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही, मात्र तुम्हाला या रोख रकमेचा हिशोब द्यावा लागतो. तुम्ही कोणत्या माध्यमातून हे पैसे कमावले आहेत. नवीन नियमांनुसार घरात ठेवलेल्या रोख रकमेचा स्रोत सांगणे आवश्यक आहे. जर तूमच्याकडे तसा हिशोब नसेल तर १३७ टक्के दंड भरावा लागतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.