Natural Calamities Prevent : दुष्काळ आणि पुरापासून मुक्तीसाठी हिरवळ हाच एकमेव मार्ग आहे. म्हणून हिरवळ वाढवण्याचे काम केले पाहिजे. समाजाने हेही समजून घेतले पाहिजे की, ज्या देशांनी आपल्या भूमीवर हिरवळ वाढवली तिथं समाजाच्या आरोग्यासोबत पृथ्वी अन पाण्याचे आरोग्य सुधारले आहे, असे आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी सांगितले.
स्वीडनमध्ये १९७२ मध्ये पहिली पृथ्वी शिखर परिषद झाली. स्वीडनने गेल्या ५० वर्षांमध्ये त्यांच्या जमिनीवरील जंगल दुप्पट केले आहे, असाही दाखला त्यांनी दिला. ()
राजस्थानमधील गोपाळपुरा गावातून दुष्काळ-पूर लोक आयोगाच्या शोधयात्रेला २६ ऑगस्ट २०२२ पासून सुरवात झाली होती. त्याचा पहिला टप्पा उर्लिकामधील जागतिक लोक आयोगाच्या कार्यालयात पूर्ण झाला.
यावेळी डॉ. सिंह म्हणाले, की गेल्या चार दशकात गोपाळपुरा गावात केलेल्या कामामुळे दुष्काळ आणि पुराने उद्धवस्त लोकांना परत आणले. परत आल्यावर लोकांनी आपली नैसर्गिक समृद्धी प्रस्थापित केली. शोधयात्रेतून बरेच निष्कर्ष पुढे आले आहेत. जगात पूर-दुष्काळ वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, आपल्या जगण्यातलं निसर्गाशी माणसाचं नातं तुटलं आहे.
आता मानवी शिक्षण तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी केवळ निसर्गाचे शोषण शिकवते. निसर्गाच्या शोषणामुळे जंगल, माती आणि निसर्गाशी असलेले प्रेमाचे नाते बिघडले आहे. त्यामुळे जंगले कमी होत आहेत. नद्यांच्या मुक्त प्रवाहाकडे जाणारे रस्ते अडवण्यात आले आहेत. नैसर्गिक मार्गांवर अतिक्रमण आणि प्रदूषण वाढले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
वरून मातीची धूप जलग्रस्त भागात साचत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी झपाट्याने येऊन मातीचे तुकडे करून ती नद्यांमध्ये गोठते. नद्यांचे पात्र वाढत आहे. पावसाचे चक्र बदलले की, पूर-दुष्काळही वाढला. त्यामुळे मानवाच्या जीवनात दुःख, संकटे निर्माण झाल्याचे आपण पाहत आहोत. हे तिसऱ्या महायुद्धाला चालना देत आहे.
शैक्षणिक संस्थांमधून निघेल मार्ग
आतापर्यंतचा शोध प्रवास केवळ समाज, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, शाळा असा होता, आता पुढच्या वर्षी २०२४ मध्ये तो एका वर्षात जगातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांपर्यंत गेला पाहिजे, असा निष्कर्षही या बैठकीत काढण्यात आला, असे सांगून डॉ. सिंह म्हणाले, की जागतिक शैक्षणिक संस्थांमधून जो मार्ग निघेल, त्या मार्गात नवे आणि सखोल आकलन मिळेल.
पण दुसरीकडे, आपण ज्यांच्याशी संवाद साधू त्यांच्याशीही निसर्गाबद्दल प्रेम आणि आदराचे नाते निर्माण होईल. मग ते लोकही आपल्या फायद्यासोबतच शुभाच्या रक्षणासाठी कामाला लागतील. शिक्षणाकडे वळण्याची गरज आहे. म्हणून जगातील १०० शैक्षणिक संस्थांमध्ये जावे आणि नैसर्गिक पोषण शिकण्याची प्रगती करावी.
त्यांच्याकडे निसर्गाच्या संपूर्णतेशी जोडण्याची संस्कृती असेल आणि नंतर ते त्यांचे शिक्षण निसर्गाच्या संपूर्णतेमध्ये समाविष्ट करून पुढील संशोधन करतील. आतापर्यंतच्या शोधप्रवासात जी वस्तुस्थिती समोर आली आहे, ती वस्तुस्थिती जगासमोर मांडण्यासाठी एक चांगले पुस्तक तयार होईल. जगाला या अनुभवातून शिकता यावे, यासाठी आपण काम केले पाहिजे.
शोधयात्रेचा दुसरा टप्पा आजपासून
बैठकीनंतर डॉ. आशुतोष तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली समारोपाचा कार्यक्रम झाला. उर्लिकाचे नगराध्यक्ष वार्टिल ॲंडरसन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. आशुतोष यांनी बाल्टिक समुद्रापासून पाण्याची जाणीव आणि पूर-दुष्काळ निवारणासाठी जगातील शंभर सर्वोत्तम संस्थांकडे आजपासून प्रवास सुरु करण्यात येत असल्याची माहिती दिली.
श्रेयांश यांनी श्री. ॲंडरसन यांना स्वीडिश भाषेतून शोधयात्रेच्या प्रवासाची माहिती दिली. श्री. ॲंडरसन म्हणाले, की २७ ऑगस्ट २०२२ ला उर्लिकामधील इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड मटेरिअल्समधून दुष्काळ-पूर जागतिक लोक आयोगाची स्थापना प्रक्रिया सुरु केली होती. माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.