brij bhushan sharan singh and raj thackeray ayodhya  sakal
महाराष्ट्र बातम्या

माफी मागीतल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश नाही - बृजभूषण सिंग

राज ठाकरे यांची ५ जूनच्या अयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी

सकाळ वृत्तसेवा

राज ठाकरे यांची ५ जूनच्या अयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र उत्तर प्रदेशातील भाजपचे बाहुबली खासदार बृजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला टोकाचा विरोध केला आहे. माफी मागीतल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश करु देणार नाही या भूमिकेवर ते ठाम आहे. राज ठाकरेंना रोखण्यासाठी तिवारी यांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. या संपुर्ण परिस्थितीवर बृजभूषण सिंग यांच्याशी सकाळने संवाद साधलाय. विनोद राऊत...

राज ठाकरेंच्या अयोध्या भेटीला विरोध करण्यामागची तूमची काय भूमिका आहे?

राज ठाकरे पहिले व्यक्ती आहे, ज्यांनी लोकप्रियता मिळवण्यासाठी उत्तर भारतीय, मराठी माणसाचा मुद्दा हाती घेतला. त्यांच्या या आंदोलनामुळे उत्तर भारतीय लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. २००८ पासून मनसेने उत्तर भारतीय नागरिकांवर हल्ले केले. ६० ते ७० हजार नागरिकांना याची झळ पोहोचली. काही जणांना मृत्यू झाला तर अनेकज मनसेच्या हल्यात जखमी झाले. त्यांना हे सर्व राज ठाकरेंच्या राजकीय भूमिकेमुळे सहन करावं लागल. त्यामुळे माझी भूमिका स्पष्ट आहे. राज ठाकरेंना अयोध्येत यायचं असेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटायचे आहे. हिंदू नेता बनायचे आहे. तर तूम्ही आतापर्यंत उत्तर भारतीयांना ज्या जखमा दिल्या, जात, भाषा, प्रांतावरुन जो भेदभाव केला.त्या कृत्याबद्दल राज ठाकरेंना माफी मागावी लागेल. ही स्पष्ट भूमिका माझी आहे.

५ जूनला अयोध्येत काय करणार आहात ?

राज ठाकरे यांनी माफी मागावी ही माझी वैयक्तीक भूमिका आहे.माझ्या पक्षाचा याच्याशी काही संबध नाही. आम्ही रामाचे वंशज आहोत. माफी मागा नाही तर अयोध्येत कुठल्याही परिस्थितीत राज ठाकरेंना आम्ही घुसू देणार नाही. महिन्याभरापासून यासाठी मी प्रांतवार दौरै करत आहे. संपुर्ण उत्तर प्रदेश आम्ही ढवळून काढला आहे. 5 जूनला, आमचे 5 लाख लोक प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत जमणार आहोत. कुठल्याही परिस्थितीत माफी मागीतल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत घुसु न देण्यासाठी आमचे कार्यकर्ते सज्ज आहोत.आम्ही आमच्या पध्दतीने त्यांना अटकाव घालणार आहोत.

राज ठाकरेंची भूमिका आता बऱ्यापैकी बदलली आहे. योगी आदित्यनाथ यांचे सातत्याने कौतूक त्यांनी केले आहे?

हरकत नाही, मात्र ही माझ्या मते ही त्यांची राजकीय यात्रा आहे, धार्मिक यात्रा नाही. धार्मिक यात्रा ढोल बडवून केल्या जात नसतता. हे सर्व राजकारण आहे. ठाकरेंना आपले अपयशी राजकारण हिदुंत्वाच्या नावाखाली नव्याने सुरु करायचे आहे. त्यासाठी हा सर्व ड्रामा सुरु आहे.

अयोध्या धार्मिक आस्थेचं प्रतिक आहे, कुणाला दर्शनापासून अडवणे योग्य आहे का ?

माझे भांडण राज ठाकरेंशी आहे. महाराष्ट्रासोबत, मराठी माणसासोबत माझे काही वैर नाही. मी तर त्या दिवशी अयोध्येत येणाऱ्या मराठी माणसाला हॉटेल,लॉजमध्ये ५० टक्के डिस्काऊंट देण्याचे आवाहन करतो. त्यांना जर राहायला जागा मिळाली नाही तर आम्ही आमचे घर खाली करुन देणार, मात्र राज ठाकरे माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही. ज्यांना काय समजायचे आहे, त्यांनी समजून जावं

भाजप हाय कमांडने आंदोलन थांबवण्याचे आदेश दिल्यास, तूमची काय भूमिका काय राहणार?

माझी भूमिका मांडल्यापासून आतापर्यंत मला भाजपच्या कुठल्याही नेत्याने संपर्क केला नाही, ना मी त्यांना संपर्क केला. मला हे करायला कुणी मनाई केली नाही. भाजप हायकमांडने मला सांगीतले तरी माझा भूमिका काही बदलणार नाही. ज्यांना शंका असेल त्यांनी आजपर्यंतच्या माझ्या राजकीय प्रवासावर एक नजर टाकावी. माझ्या भूमिकेवर मी कायम ठाम राहीलो आहे.

राज ठाकरेंनी माफी मागीतल्याचा दावा साध्वी कांचन यांनी तूमच्याकडे केला होता?

कांचन साध्वीला मी ओळखत नाही. त्या दिवशी अचानक ती प्रकटली होती. मी सांगीतली जशी आम्ही पत्रकार परिषद केली, तशीचं राज ठाकरेंनी करावी. जाहीर माफी मागावी. प्रकरण समाप्त होईल. आता साध्वी परत फिरकणार नाही, याची मला खात्री आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT