Irshalwadi Landslide Update : रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात बुधवारी रात्री भूस्खलन झाल्याचा प्रकार समोर आला. या दुर्घटनेत गावातील १७ ते १८ घरे माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या घटनेत आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला असून अद्याप शंभरपेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे.
दरम्यान, दरडग्रस्त भागातील नागरिकांना त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून देण्यात आलेले आहेत. मागील काही वर्षात दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्य सचिवांना करण्यात आलेल्या आहेत.
महत्त्वाचं म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्यासह मंत्री गिरीश महाजन आणि तानाजी सावंत यांच्या कालच्या कामाचं सर्व मंत्र्यांनी कौतुक केलं. मुख्यमंत्र्यांनी दिवसभर स्वतः उभे राहून इर्शाळवाडीत घटनास्थळी आढावा घेवून कामे तात्काळ मार्गी लावले. त्यांच्याही कामाचं कौतुक झालं. राज्यातील दरडप्रवण क्षेत्राचा पुन्हा नव्याने आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांनी दिले आहेत.
इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी आजही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सततचा पाऊस आणि खराब हवामानामुखे काल रात्री बचावकार्य थांबवण्यात आलं. त्यानंतर आज पहाटे ५ वाजेपासून पुन्हा हे काम सुरू करण्यात आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.