Implement irrigation schemes rather than bullet trains rohit pawar drought Sakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्राचं भाजप सरकार गुजरातसाठी काम करतंय का? रोहित पवारांचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योग गुजरातला हलिवण्यात येताहेत. त्यानंतरही हे सरकार झोपेत आहे. सध्याची स्थिती पाहता राज्य सरकार गुजरातच्या दावणीला बांधलेले दिसतेय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार सोमवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. दरम्यान त्यांनी परिधान केलेले शिक्षक भरतीचा मुद्दा मांडणारे जॅकेट सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

मुंबईत हिऱ्याचा व्यवसाय दीड लाख कोटींहून अधिकचा आहे. हा व्यवसाय सांभाळून ठेवण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु, गुजरात सरकार हा उद्योग अहमदाबादला घेऊन जाण्याचा घाट रचत आहे. गुजरातचे व्यापारी सातत्याने मुंबईतील हिऱ्यांच्या मोठ्या व्यापाऱ्यांशी संपर्कात आहेत.

महाराष्ट्रातील उद्योग तिथे हलविण्यासाठी विविध प्रकारची आमिषे देण्यात येत आहेत. परंतु, राज्यातील नेते दिल्लीला मुख्यमंत्रीसह विविध पदे मागण्यात मश्गुल आहेत. उद्योग खाते झोपलेले आहे. हिरे व्यवसाय राज्यातून गुजरातला गेल्यास सुमारे दोन लाख लोकांचा रोजगार जाणार आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता राज्यातील भाजप सरकार गुजरातसाठी काम करतेय का, असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.

६० हजार शिक्षक भरती करा

नको पोकळ्या घोषणा ६० हजार शिक्षक भरती करा, समूह शाळा दत्तक शाळा म्हणजे सरकारच्या पोकळ खेळ, गरीब विद्यार्थ्यांवर कशाला आणताय वाईट वेळ असा मजकूर लिहीलेले जॅकेट घालून आमदार रोहित पवार सोमवारी विधानभवनात आलेत.

जॅकेटच्या माध्यमातून शिक्षक भरतीचा मुद्याकडे रोहित पवारांनी लक्ष वेधले आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या दोन अधिशनामध्ये शब्द दिला. पण, प्रत्यक्षात भरती झालेली नाही, असा दावा पवार यांनी केला. यावेळी त्यांनी समूह शाळेचा मुद्दादेखील मांडला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT