Monsoon Rain sakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Rain : रायगडावर बरसला ढगफुटीसदृश पाऊस;किल्ल्यावर ३१ जुलैपर्यंत पर्यटकांना बंदी

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : जोरदार पावसाने रायगडमधील जनजीवन विस्कळित झाले आहे. दक्षिण रायगडमधील पोलादपूर, महाड, तळा, म्हसळा या तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे शाळा, महाविद्यालयांना सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी सुटी जाहीर केली होती. जिल्‍ह्यातील बहुतांश नद्या तुडूंब वाहत असून हवामान विभागाने दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. किल्ले रायगड परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने किल्‍ल्‍याच्या पायवाटेचे मोठे नुकसान झाले.

त्यामुळे किल्‍ला ३१ जुलैपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. रविवारी दुपारपासून सुरू झालेला पावसाचा वेग मध्यरात्रीनंतर चांगलाच वाढला. दरम्यान नागरी वस्तीत शिरलेल्‍या पाण्यामुळे अलिबाग तालुक्यातील मल्याण, रामराज, नेहुली येथील नागरिकांची तारांबळ उडाली. त्याचबरोबर अलिबाग-मुरूड रस्त्यावरील चिकणी पूल एका बाजूने खचला. मुंबई- गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत डोंगरावरील माती रस्त्यावर आल्‍याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. जिल्ह्यातून वाहणाऱ्या सावित्री, काळ, अंबा, पाताळगंगा या नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.

‘यंत्रणांनी सज्ज राहावे’

‘‘राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सावध व सज्ज राहावे,’’ असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

३५० पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द

मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांना रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले. परिणामी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली होती. सीएसएमटी-पनवेल लोकल सेवा तब्बल तीन तास ठप्प होती; तर मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा तासभर ठप्प होती. त्यामुळे दिवसभर दोनशेपेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस रेल्वे गाड्या पावसामुळे रद्द कराव्या लागल्या.

त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवारी पहाटेपासून मुंबई आणि उपनगरांत जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे सखळ भागातील सायन, कुर्ला, चुनाभट्टी रेल्वेस्थानकांदरम्यान रेल्वे रूळ पाण्याखाली गेले. विद्याविहार, कुर्ला, सायन आणि नाहूर स्थानकांत रेल्वे रुळांवर चार इंचापर्यंत पाणी आल्याने पहाटे ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची लोकल सेवा बंद करण्यात आली.

सर्वाधिक पाऊस (मिमी)

  • तळा१३७.७

  • म्हसळा२३६.३

  • श्रीवर्धन१३२.५

  • मुरूड२५१.१

  • महाड६६.२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT