Jackson Vadh esakal
महाराष्ट्र बातम्या

Jackson Vadh : नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचा भर नाटकात खून करणारे क्रांतिवीर अनंत कान्हेरे

बाबाराव सावरकरांची गाढवावरून काढलेली धिंड नाशिकरांच्या तळपायाची आग मस्तकाला भिडवणारी होती

सकाळ डिजिटल टीम

Jackson Vadh : बाबाराव सावरकरांची गाढवावरून काढलेली धिंड नाशिकरांच्या तळपायाची आग मस्तकाला भिडवणारी होती, पण याचा कर्ता धरता जॅक्सन हा खूप क्रूर अधिकारी होता त्यामुळे सगळ्यांनी शांत बसायच ठरवलेल. पण या सगळ्यातही 3 तरुण असे होते ज्यांनी या अपमानाचा बदला घेयचा ठरवल आणि २१ डिसेंबर १९०९ त्याच्यावरती गोळ्या झाडल्या.

अनंत कान्हेरे यांच्या बद्दल अनेकांना माहिती आहे, त्यांचा जन्म ७ जानेवारी १८९२ रोजी रत्नागिरीत झाला, त्यांना दोन बहिणी आणि दोन भाऊ होते. माध्यमिक शिक्षणासाठी संभाजीनगरला (औरंगाबादला) गेले, तिथे त्यांनी क्रांतीकार्यात भाग घेतला, ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते.

बाबाराव सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. कान्हेरे क्रांतिकारी गटांच्या कार्याकडे आकर्षित झाले. सावरकर बंधूनी नाशिकमध्ये अभिनव भारत संस्थेची स्थापना केली.

कृष्णाजी गोपाळ कर्वे यांनी बाबाराव सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली एका गुप्त गटाची स्थापना केली. या गटात विनायक नारायण देशपांडे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि अनंत कान्हेरे सहभागी होते. सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले.

सावरकर बंधूंच्या मागे इंग्रज सरकार सतत खार खाऊन होते, अशातच बाबाराव सावरकरांच्या विरोधात पुरावे मिळाल्याने तेव्हाच्या नाशिकच्या कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सनने त्यांची गाढवावरून धिंड काढली. सगळ्याच क्रांतिकारकांचा यामुळे राग अनावर झाला होता आणि जॅक्सनची मुंबईमध्ये वरच्या पदावर बदली करण्यात आली. त्याला नाशिकमध्येच मारण खूप सोप्पं होतं.

असा रचला जॅक्सन वधाचा कट

२१ डिसेंबर १९०९ रोजी नाशकातल्या विजयानंद थिएटरमध्ये किर्लोस्कर कंपनीचा 'शारदा' या नाटकाचा प्रयोग फक्त जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी ठेवला होता. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच. त्याला चाफेकर बंधूंनी मारलं तसं रस्त्यात मारणं अशक्य होतं कारण जॅक्सनला व्यवस्थित पोलिसांचा घेरा होता.

अनंत कान्हेरेंनी ठरवलं, नाट्यगृहातच जॅक्सनला मारायच. नाटकाचा प्रयोग वेळेत सुरू झाला, रंगमंचावरती बालगंधर्व आणि नानासाहेब जोगळेकर होते, गंधर्व नाट्यगीत सादर करत असतांनाच जॅक्सन नाट्यगृहात आला, त्याला तिथे बघून गर्दीतल्या अनंत कान्हेरेने पिस्तूल काढून त्याला गोळ्या झाडल्या.

पिस्तुलाच्या आवाजाने सगळीकडे थरकाप उडाला, कान्हेरे आपल्या जागीच शांत उभे राहिले कारण आत्मसमर्पण केलं तर त्यांच्या इतर साथीदारांवरचा धोका टळेल पण दुर्दैवाने त्यांच्या साथीदारांना धावता आलं नाही आणि त्यांना अटक झाली. जॅक्सन जागीच ठार झाला. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. १९ एप्रिल १९१० या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT