Five people killed and 5 injured in accident on Mohol Pandharpur Palkhi route  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

संतप्त ग्रामस्थांची दगडफेक, 2 पोलीस जखमी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ मंगळवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास भरधाव कारनं दिलेल्या धडकेत दुचाकीवरील आई आणि २ मुलं जागीच ठार झाल्याची भीषण घटना घडली आहे. तर या घटनेत आणखी एक १२ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी घटनास्थळी रास्ता रोको करत दगडफेकही केली. यात दोन पोलीस जखमी झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon major accident laborer mother and her two children were killed)

आई राणी सरदार चव्हाण (वय ३०), मुलं सोमेश सरदार चव्हाण (वय २) आणि सोहन सरदार चव्हाण (वय ७, सर्व रा. रामदेववाडी, जळगाव) अशी मृतांची नाव आहेत. त्यांचं कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरर्निर्वाह करतं.

मंगळवारी (ता.7) राणी चव्हाण या आपली दोन्ही मुलं सोहन व सोमेश यांच्यासह लक्ष्मण भास्कर राठोड (वय १२) यांच्यासह जळगावी कामानिमित्त निघाल्या होत्या. गावाच्या बाहेर आल्यावर अचानक आलेल्या भरधाव कारनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तिन्ही मुले एका बाजूला फेकली गेली. त्यात राणी चव्हाण आणि सोमेश यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच डोक्याला गंभीर मार लागल्यानं सोहनचा देखील मृत्यू झाला. (Marathi Tajya Batmya)

संतप्त नागरिकांचा रस्ता रोको

अपघाताची माहिती मिळताच रामदेववाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं घटनस्थळी जमा झाले आणि त्यांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको केला. सोहन चव्हाण व लक्ष्मण राठोड यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तेव्हा सोहनला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केलं. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती चव्हाण कुटुंबियांना कळताच त्यांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. (Latest Marathi News)

परिस्थिती नियंत्रणाबाहेर

संतप्त जमावानं घटनास्थळी रास्ता रोको आणि दगडफेक केल्यानं पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यामुळं चार तास राणी चव्हाण व सोमेश यांचा मृतदेह घटनास्थळीच होता. दगडफेक सुरू झाल्यानं पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकाच्या दोन टीम बोलावल्या. त्यानंतर काही वेळानं पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणून जमावाला शांत करण्यात यश मिळालं. या दगडफेकीत दंगा नियंत्रण पथकाचे एक पुरुष आणि एक महिला पोलीस जखमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT