Jalgaon ration stop if CM Eknath Shinde does not attend public rally on Shasan Aplya Dari Yojana 2023  
महाराष्ट्र बातम्या

CM Shinde in Jalgaon: मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी जळगावकरांचे रेशनपाणी होणार बंद ? ही तर अफवाच ! जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गैरहजर राहिल्यास जळगावकरांचे रेशनपाणी होणार बंद?

धनश्री ओतारी

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गैरहजर राहिल्यास जळगावकरांचे रेशनपाणी होणार बंद असा मेसेज व्हायरल झाल्याने जळगावरकर चांगलेच धास्तावले आहेत. पण ही अफवा असल्याचे सांगत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी मोठा खुलासा केला आहे. (Jalgaon ration stop if CM Eknath Shinde does not attend public rally on Shasan Aplya Dari Yojana 2023 )

‘शासन आपल्या दारी’ मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी जळगावात सभा होत आहे. या कार्यक्रमासाठी सगळीकडेच गर्दी जमवण्यासाठी शासकीय यंत्रणेचा पुरेपूर उपयोग केला जात असल्याचा विरोधक आरोप करत आहेत.

रेशन दुकानदारांकडून गुलाबी रेशनकार्डधारकांना सोशल मीडियावर धमकीवजा इशारा देणारे हे संदेश पाठवण्यात आले आहेत. आपले धान्य बंद होईल की काय? अशी भीती दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना वाटू लागली आहे. (Latest Marathi News)

इतकेच नव्हे तर जळगाव महापालिकेच्या शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही शाळेच्याच वेळेत होत असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे फर्मान बजावले आहे. म्हणजे अप्रत्यक्षपणे शाळा बंद ठेवण्याचे लेखी आदेश दिले आहेत. शासकीय यंत्रणेच्या गैरवापराने लाभार्थी धास्तावले आहेत. मात्र, यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे जिल्हाधिकारी मित्तल यांनी म्हटलं आहे.(Latest Marathi News)

...तर त्यांचे परवाने रद्द करू

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना या संदर्भात विचारणा केली असता ‘लाभार्थींनी सभेला यावे, अशी अपेक्षा आहे, पण कोणावरही सक्ती नाही. असे संदेश पाठवायला कुणीही सांगितले नाही. धान्य बंद करण्याचा प्रश्नच येत नाही. जे दुकानदार अशा धमक्या देतील त्यांचे परवाने रद्द करू. महापालिका प्रशासनाने शाळांना दिलेले आदेशदेखील मागे घेण्यास सांगण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SIP Investment: शेअर बाजार कोसळत आहे; एसआयपी बंद करावी की सुरु ठेवावी? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Latest Maharashtra News Updates live : 'बाटोगे तो कटोगे' घोषणेवर भाजप खासदार कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT