Accident sakal media
महाराष्ट्र बातम्या

जळगाव : हिरापूरजवळ भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

चाळीसगावजवळ घडली दुर्घटना

Amit Ujagare (अमित उजागरे)

चाळीसगाव : येथील नांदगाव रस्त्यावरील हिरापूर (ता. चाळीसगाव) गावाजवळ क्रूझर गाडी उलटल्याने झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (ता.१) रात्री साडेदहाच्या सुमारास भावसार पेट्रोल पंपाजवळ घडली. या अपघातात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना प्राथमिक उपचारानंतर धुळे येथे रवाना करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, डोंगरगाव (ता. पाचोरा) येथील काही मजूर कामानिमित्त मनमाड गेलेले होते. आज क्रूझर गाडीने (क्रमांक : एमएच १३ एसी ५६०४) घरी डोंगरगावला परत येत असताना रात्री दहाच्या सुमारास चाळीसगाव- नांदगाव रस्त्यावरील हिरापूर गावाजवळ क्रूझर भरधाव वेगात असल्याने अचानक घसरली. गाडी वेगात असल्याने रस्त्यावर आदळून झालेल्या अपघातात गाडीतील ३ जण जागीच ठार झाले.

हा अपघात इतका भीषण होता, की गाडीतील सर्वच्या सर्व मजूर गंभीर जखमी झाले, यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. कमलेश हरी काटे, बापू सुभाष पाटील, शेखर राजेंद्र तडवी, अनिस तडवी, शाहरुख तडवी, चंदन हरी काटे, मुक्तार तडवी, दिलीप तडवी, विकास तडवी, सचिन तडवी, नाना प्रभाकर कोळी व इतर प्रवासी वाहनात होते.

आमदारांचे मदतकार्य

अपघाताची माहिती समजताच आमदार मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी तातडीने दोन रुग्णवाहिका रवाना केल्या.स्वतः लगेचच ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींवर उपचार करण्यासंदर्भात डॉक्टरांना योग्य त्या सूचना केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT