jitendra awhad sakal media
महाराष्ट्र बातम्या

"वीस वर्षे गायब असलेला जेम्स लेन आजच कसा समोर आला?"

भांडारकर संस्थेवर हल्ला झाला, पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण दिला तेव्हा लेन कुठे होता? असा सवालही आव्हाड यांनी विचारला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण करणारा अमेरिकन लेखक जेम्स लेन यानं एका न्यूज पोर्टलला दिलेल्या कथीत मुलाखतीवरुन महाराष्ट्रात पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटलं आहे. यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना काही सवाल उपस्थित केले आहेत. जेम्स लेन गेल्या वीस वर्षांपासून गायब होता तो आत्ताच कसा समोर आला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (James Lane who has been missing for 20 years how he came to be appear today says Jitendra Awhad)

माध्यमांशी बोलातना आव्हाड म्हणाले, "वीस वर्षानंतर जेम्स लेन आत्ताच कसा समोर आला? भांडारकर संस्थेवर हल्ला झाला तेव्हा आणि बाबासाहेब पुरंदरे यांना 'महाराष्ट्र भूषण' दिला तेव्हा हा लेखक का समोर आला नाही? आत्ताच तो कसा समोर आला? वीस वर्षे तो गायब होता यावर मला काहीच म्हणायचं नाही, पण त्यानं आपल्या पुस्तकातून वादग्रस्त उल्लेखाचं पान काढून टाकावं, अशी मागणी लेनची मुलाखत घेणाऱ्या पत्रकारानं करावी"

"पुरंदरेंच्या इतिहासाबद्दल मला काही बोलायचंच नाही. कारण त्यांनी इतिहासाचा बट्ट्याबोळ केला. ते स्वतः कादंबरीकार होते आणि जेम्स लेनही स्वतः आपण कादंबरीकार असल्याचं सांगतो. पण सोलापूरात जेम्स लेनच्या पुस्तकाबद्दल माहिती देताना पुरंदरेंनी स्वत: लेनला अभ्यासक म्हटलं होतं. जेम्स लेनच्या 'शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकातील पान नं. ९३ वरच्या परिच्छेदात वादग्रस्त लिखाण करण्यात आलं आहे. जेम्स लेनच्या पुस्तकातील सुरुवातीपासूनचं एक-एक वाक्य शिवाजी महाराजांविरोधातील आहे. त्यामुळं लेनची मुलाखत ज्यानं मुलाखत घेतली आहे, त्यानं लेनला हे पान पाठवून द्यावं आणि त्याला पुस्तकातून हे पान काढून टाकण्यास सांगाव"

सत्तर-ऐंशीच्या काळात बहुजनांमध्ये शिक्षणंच नव्हतं. सन २००० नंतर बहुजनांची मुलं शिकायला लागली त्यानंतर त्यांनी खरा इतिहास महाराष्ट्राच्या समोर आणला. यापूर्वीच्या काळात पुरंदरेंना सर्वजण इतिहासकारच मानायचे. पण आता दावा केला जातोय की पुरंदरे हे कादंबरीकार होते, असंही यावेळी आव्हाड यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरू नये म्हणून केंद्राचा निर्णय

Mahadev Jankar: “मुख्यमंत्र्यानी नाही, पण पंतप्रधान नक्की होणार”; जानकरांनी व्यक्त केला विश्वास

Patanjali Owner: ना बाबा रामदेव, ना आचार्य बाळकृष्ण... 67,535 कोटी रुपयांच्या पतंजलीचा खरा मालक कोण?

Chitra Wagh: लाडकी बहीण योजना कर्नाटकाच्या गृहलक्ष्मी योजनेपेक्षा सरस, चित्रा वाघ यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT