Jayakwadi Dam Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! जायकवाडी चौथ्या वर्षी ‘फुल्ल' होण्याच्या दिशेने

सकाळ वृत्तसेवा

मराठवाड्याच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाणारे जायकवाडी धरण चौथ्या वर्षी ‘फुल्ल' होण्याच्या दिशेने आहे. मेंढीगिरी समितीच्या शिफारशीनुसार जायकवाडीमध्ये ६५ टक्क्यांपेक्षा कमी साठा असल्यास नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरण समूहातून पाणी सोडावे लागते. यंदा मात्र ती परिस्थिती राहणार नाही. संततधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जायकवाडीमधील जलसाठा शनिवारी (ता. १६) रात्री ६५ टक्क्यांच्यापुढे पोचला होता. आज सकाळपर्यंत हा जलसाठा ६७.४७ टक्के झाला आहे.

जायकवाडीमधील उपयुक्त साठा ६५ टक्क्यांपर्यंत पोचण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंतची प्रतीक्षा करावी लागत होती. नांदूरमधमेश्‍वर धरणातून आज सकाळपर्यंत २६.५८ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात जायकवाडीमधील जलसाठा ३७ टक्क्यांपर्यंत होता. नांदूरमधमेश्‍वरहून सोडण्यात येत असलेल्या पाण्याचे प्रमाण पाहता, शनिवारपर्यंत (ता. १६) जायकवाडीमधील जलसाठा ६५ टक्क्यांपर्यंत पोचण्याचा अंदाज जलअभ्यासकांनी वर्तवला होता. यासंबंधीचे वृत्त ‘सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते.

नाशिक जिल्ह्यात जुलैच्या पावसाचा विक्रम
नाशिक : यंदाच्या मोसमात जुलै महिन्‍यात पावसाने सगळ्या तालुक्यांत विक्रम केले. जूनमधील ओढीनंतर जिल्ह्यात यंदा जुलैमध्ये वरुणराजा मुसळधार बरसला. परिणामी, प्रत्येक तालुक्यांत धरणांत ७५ टक्के साठ्याची सोय करुन पाउस सध्या विसावला आहे. जूनमध्ये यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी पाउस झाला. मात्र, ही कसर पावसाने जुलैमध्ये भरून काढली. जिल्ह्यातील तालुकानिहाय पावसाचा विचार केला तर, सगळ्या तालुक्यांत जुलैच्या सरासरीच्या १२४ ते ५०० टक्के पाऊस झाला आहे.

कोयना धरणामध्ये ५६ टीएमसी पाणी
पाटण (जि.सातारा) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊसाची संततधार कायम आहे. मुसळधार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ३५ हजार १६४ क्यसेक झाली आहे. २४ तासांत धरणाचा पाणीसाठा तीन टीएमसीने वाढला आहे. धरणाचा रविवारी सायंकाळचा पाणीसाठा ५६.३९ टीएमसी आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेते रिंगणात; कोणाला कोठून संधी?

Ramesh Wanjale: मनसेनं ठेवली आठवण! रमेश वांजळेंचे पुत्र मयुरेश वांजळेंना खडकवासल्यातून उमेदवारी जाहीर

Pune Crime : मालकाने पाळीव कुत्र्याला लटकावले फासावर; पर्वतीमध्येही श्वानावर गोळी झाडल्याचा प्रकार उघडकीस

MNS Vidhan Sabha Candidate List: दुसरे ठाकरेही निवडणुकीच्या रिंगणात! मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर; वरळीतून संदीप देशपांडे

महिला आयोगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची कंत्राटे रद्द; ऐन दिवाळीत क्रूर निर्णय घेतल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT