Sharad-Pawar-Jayant-Patil e sakal
महाराष्ट्र बातम्या

'देशातील कुठल्याही नेत्याला पवारांचं मार्गदर्शन घ्यावं लागतंय'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८१ वा वाढदिवस (Sharad Pawar 81 Birthday) आहे. त्यानिमित्त मुंबईतील नेहरू केंद्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटलांनी (Maharashtra Minister Jayant Patil) पवारांना शुभेच्छा देत वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केले. देशातील कोणत्याही नेत्याला पवारांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं, असं जयंत पाटील म्हणाले.

समाजाला न्याय देण्याची भूमिका पवारांच्या निर्णयात होती. मराठवाडा विद्यापीठ नामकरण, महिलांच्या आरक्षणात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. ममता बॅनर्जींनी नुकतीच राज्यात आल्यानंतर शरद पवारांची भेट घेतली. देशातील कोणत्याही नेत्याला पवार साहेबांचं येऊन मार्गदर्शन घ्यावं लागतं. दिल्लीत गेल्यानंतरही नेते येऊन पवार साहेबांचं मार्गदर्शन घेतात. पवारांचा नेम नसतो म्हणतात. पण, त्यांचा नेम अचूक असतो, असं जयंत पाटील म्हणाले.

आरएसएसचं काम किती चांगलं हे भाजप सत्तेत आल्यानंतर सांगायला सुरुवात झाली. काँग्रेसनं सुद्धा सेवा दल नावाची व्यवस्था निर्माण केली होती. ही संस्था सेवाभावी वृत्तीने काम करतेय. पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं मलाही असं वाटतंय की विचारावर आधारीत कार्यकर्ता तयार केला तर पक्षाला प्रभावीपणे नवे कार्यकर्ते मिळतील. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात राष्ट्रवादीच आहे. महाराष्ट्रात विचारांचं धन वाढवण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात महिन्याच्या पहिल्या शनिवारी आमच्या सगळ्या ग्रामस्थांनी, जे कार्यकर्ते आहेत त्यांनी एकत्र यायचं आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.

जनरल बिपिन रावत यांचा मृत्यू म्हणजे संरक्षण यंत्रणेवर संशय -

जनरल बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू झाला. जगाच्या पाठीवर सर्वोत्कृष्ट हेलिकॉप्टरमधून ते प्रवास करत होते. रडार माहिती असलेलं हेलिकॉप्टर भारताच्या सीडीएसला घेऊन कोसळलं ही धक्कादायक घटना आहे. संरक्षण यंत्रणेवर ही घटना संशय व्यक्त करणारी आहे. चौकशीत काय समोर येतेय हे पाहावे लागेल. देशाच्या संरक्षण व्यवस्थेत आणि सर्वच व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं, असं जयंत पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Tingare : पुण्यात चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला; वडगावशेरीत घडली घटना

Latest Marathi News Updates : पैसे वाटपाच्या आरोपांवर विनोद तावडेंचं स्पष्टीकरण

...म्हणून 'हम साथ साथ है' मध्ये माधुरी दीक्षितला घेतलं नाही; म्हणते- मी चित्रपटाला नकार दिलाच नव्हता

Vinod Tawde : अन् विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर एकाच गाडीतून हॉटेलमधून पडले बाहेर, कारण काय?

IND vs AUS : भारताचे आघाडीचे ६ फलंदाज ठरले? एका फोटोने पर्थ कसोटीसाठीची स्ट्रॅटजी केली उघड

SCROLL FOR NEXT