Jayant Patil : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी आल्याची बाब समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.
तुमचा देखील दाभोळकर करु, अशी धमकी शरद पवार यांनी आली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला या प्रकरणी कारवाई करण्याचे सांगिलते आहे.
जयंत पाटील म्हणाले, या प्रकरणाची दखल घेतली पाहीजे. तातडीने चौकशी करावी. सोशल माध्यमांवर आलेली धमकी म्हणून कोणीही दुर्लक्ष करु नये. अशा प्रकारच्या विचार करणाऱ्या व्यक्तिवर कठोर कारवाई करावी, शरद पवार यांना काहीही झालं तर गृह खात जबाबदार असेल.
शरद पवार विरोधात असतात तेव्हाच दंगलीच्या घटना घडतात, असे प्रविण दरेकर म्हणाले. यावर जंयत पाटील म्हणाले, या राज्यात दंगली घडवल्या तर कुणाचा फायदा होतो, हे जगजाहीर आहे. लोकप्रियता कमी झाल्यामुळे ती सावरण्यासाठी काही लोक असे वक्तव्य करतात. पण शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मार्गाने जाणारा पक्ष नाही.
शरद पवार यांना औरंगजेबाची उपमा देण्यात आली यावर देखील जयंत पाटील यांनी भाष्य केले. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शरद पवार विरोधकांचे शक्तिस्थळ आहेत. त्यामुळे या प्रवृत्तीचे लोक या प्रकारचे वक्तव्य करतात.
औरंगजेबाचा पुळका कुणालाही येण्याची आवश्यकता नाही. औरंगजेबाच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वांच्या ज्या भावना आहेत. त्याच आमच्या भावना आहेत. मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही लोक, असे वक्तव्य करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.