Jayashree Thorat on Vasantrao Deshmukh ESakal
महाराष्ट्र बातम्या

Jayashree Thorat: भाजप नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य; जयश्री थोरातांनी सोडलं मौन, आक्रमक होत म्हणाल्या...

Jayashree Thorat on Vasantrao Deshmukh: भाजप नेत्याने आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. यावर जयश्री थोरातांनी मौन सोडलं आहे.

Vrushal Karmarkar

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे-पाटील यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत भाजपच्या वक्त्याने बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संगमनेर तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले असून या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी गाड्यांच्या काचा फोडल्या तर काही ठिकाणी गाड्या पेटवल्या. आता यावर जयश्री थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या सर्व घटनेवर जयश्री थोरात यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जयश्री थोरात म्हणाल्या की, वसंतराव देशमुख यांनी जे वक्तव्य केले आहे ते न शोभणारं आहे. एकीकडे भाजप आणि सरकार महिलांना राजकारणात ५० टक्के आरक्षण देण्याच्या गप्पा करतात. मात्र भाजपमध्येच अशा प्रकारची वक्तव्ये करणारे लोक आहेत. तर महिलांनी राजकारणात कसं आणि का यावं? मी फक्त माझ्या वडिलांसाठी मैदानात उतरले होते. मी युवा संवाद यात्रेदतून लोकांना भेटत होते. तरीही मी असं काय केलं की माझ्याबद्दल इतकं वाईट बोलले, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

वसंतराव देशमुख यांनी जे वक्तव्य केले ते त्यांच्या वयाला शोभणारं विधान आहे का? ज्या कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून गेले त्याच कार्यक्रमात त्यांनी अशी गलिच्छ भाषा वापरली. विराधकाला बोलण्याची एक पातळी असते. मात्र आता त्यांनी त्यांच्या मुलीच्या वयाच्या मुलीबद्दल असं वक्तव्य केले. यापूर्वी माझ्या आजोबांनी त्यांना सरळ केलं होतं. परंतू अद्याप त्यांच्यात बदल झाला नाही. अशा माणसाला लोक कार्यक्रमाता अध्यक्ष कसं करू शकतात? अशा तीव्र शब्दात जयश्री थोरातांनी संताप व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Candidate List: शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; बीडच्या सस्पेन्सवर पडदा; 'यांना' दिली उमेदवारी

Latest Maharashtra News Updates : भाजप मुंबईत १८ जागा लढवणार

Shivsena UBT Candidate 3rd List : विधानसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आणखी तीन शिलेदार जाहीर! 'येथे' पाहा तिसरी यादी

मंदार देवस्थळींनी सांगितला 'आभाळमाया'चा सर्वोत्तम सीन, म्हणाले- रात्री ९ वाजता सुधीर घरी येतो आणि...

Kuldeep Yadav ला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघातून का वगळलं? खरं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT