Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुढे काय होईल? भाजप-RSS बैठकीबद्दल जितेंद्र आव्हाडांचा 'एक्स'वर मोठा गौप्यस्फोट

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये मोठा गौप्यस्फोट केला आहे

रोहित कणसे

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले असून यानंतर आता राज्यातील निवडणूकांच्या तयारीला जोर येणार आहे. दरम्यान नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी अशी चर्चा सुरू झाल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा दावा केला आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपने तीन राज्यात मोठा विजय मिळवला आहे. यानंतर भाजप हायकमांडने या तीनही राज्यात मुख्यमंत्री पदासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये भाजपने बड्या चेहऱ्यांना डावललं. या पार्श्वभूमिवर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आव्हाड काय म्हणालेत?

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले." असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

"या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले." असा दावा देखील आव्हाडांनी केला आहे.

इतकेच नाही तर आव्हाडांनी पुढे लिहीलं की, ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही."

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता या दाव्यावर एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील अजित पवारांचा गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

Mumbai Indians Squad IPL 2025: मुंबई इंडियन्सचा संघ दिसतोय तगडा, RCB च्या स्टार खेळाडूला सोबत घेऊन मारली बाजी

SCROLL FOR NEXT