mumbai sakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: आव्हाडांचा खळबळजनक दावा! शिंदेंच्या बंडांनंतर २४ तासांत पत्र तयार होतं पण...

महाराष्ट्रातील सत्तांतराच्या खेळात रोज नवनवी घडामोडी घडत आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तांतराच्या खेळात रोज नवनवी घडामोडी घडत आहेत. यामध्ये पुन्हा एकदा नवा खळबळजनक खुलासा झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी हा खुलासा केला असून शिंदेंच्या बंडानंतर २४ तासांत सत्तेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचं पत्र तयार होतं, त्यावर आपणही सही केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Jitendra Awhad Exciting claim after Ekanth Shinde rebellion NCP MLA Support letter was prepared)

आव्हाड म्हणाले, भाजपबरोबर जाण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडे होता. शिंदेंनी बंड केल्यानंतर २४ तासात राष्ट्रवादीकडून आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र तयार केलं होतं. अजित पवारांनी सांगितलं म्हणून आमदारांनी त्यावर सही केली होती. यामध्ये मी देखील सही केली होती. पण पवार साहेबांना एकटं कसं सोडायचं म्हणून जयंत पाटीलांनी पत्र दिलं नाही. (Latest Marathi News)

तनपुरेंनी केला होता विरोध

पण याला विरोध करणारा पहिला आमदार प्राजक्त तनपुरे होता तो म्हणाला होता हे योग्य नाही. ज्या बैठकीत पत्रावर सह्या घेतल्या गेल्या. त्या बैठकीत आमदार दिलीप बनकरांनी भूमिका मांडली होती की पवारसाहेबांचं वय झालं आहे, त्यांना राहू द्या आपण भाजपला पाठिंबा देऊयात, याला जयंत पाटील यांनी विरोध केला होता. (Marathi Tajya Batmya)

वळसेंना बंडाची माहिती असणार

मविआचं सरकार असताना शिंदेंचं बंड होणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना माहिती असणार. त्यांना पहिल्या १५ मिनिटांत याची माहिती मिळाली असणार, असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT