Ajit Pawar and Jitendra Awhad  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : आव्हाडांना आम्लपित्ताच्या गोळ्यांची गरज; अजित पवार गटाची खोचक टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन १० दिवस उलटून गेले. मात्र अद्याप खाते वाटप झालेले नाही. यावरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली होती. याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सुरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं.

सुरज चव्हाण म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचा आम्लपित्तांचा त्रास वाढला आहे. त्यांना आम्लपित्तांच्या गोळ्यांची गरज आहे. तसेच स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना च्यवणप्राशची गरज आहे. कारण, याआधीची मंत्रिमंडळात शपथ घेतल्यानंतर खातेवाटपासाठी वेळ लागला होता. महाविकास आघाडीत देखील असंच काहीस झालं होतं. तेव्हा देखील दिल्लीत चर्चा व्हायची. आताही तेच होतय. मात्र आव्हाड यांची टीका केवळ राजकीय द्वेषातून असल्याचं चव्हाण यांनी नमूद केलं.

ते पुढं म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे. सरकारही बहुमतात आहे. नाना पटोले यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी कोणत्या आधारावर केली, हे त्यांनाच ठावूक. तसेच लवकरच खातेवाटपाबाबत चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल, असा दावाही चव्हाण यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Boycott on Election : महाराष्ट्रातील 10 लाख सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा निवडणुकीवर बहिष्कार,का घेतला हा निर्णय ?

गस्तीला गुलाबी जीपमधून आली अन् घेतलं चुंबन, महिला पोलिसाच्या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल, प्रकरण काय?

Latest Maharashtra News Updates Live : अंधेरीतील भाजप नेते मुर्जी पटेल यांचा आज रात्री वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता

RRB Recruitment 2024: रेल्वेत तीन हजार जागांसाठी मेगाभरती; बारावी पास असलेल्यांना संधी, शेवटचे दोन दिवस

Diwali Recipe : बुंदी-बेसनाच्या फंदात पडू नका, दिवाळीला अगदी झटपट होणारे हे लाडू बनवा

SCROLL FOR NEXT