राष्ट्रवादी काँग्रेसमधले फायरब्रँड नेते. पक्षातला ओबीसी चेहरा अशीही त्यांची ओळख आहे. कळवा-मुंब्रा मतदार संघातून ते निवडून येतात. 2002 मध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सर्वात प्रथम आमदारकीची निवडणूक लढवली होती. त्यानानातर ते सलग कळवा मुंब्रा मतदार संघातून निवडून येतायत.
आघाडीच्या काळातही त्यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. आपल्या वकृत्त्वाच्या जोरावर ते पक्षाची भूमिका ठामपणे मांडतात. सध्याच्या काळात शरद पवारांच्या सर्वात जवळच्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो. महाविकास आघाडीच्या आमदारांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्यावरच होती. शिवाय आमदारांना कर्तव्यदक्षतेची शपथ देण्याची संकल्पानाही आव्हाडांनीच राबवली.
शरद पवारांचे अत्यंत निकट वर्तीय म्हणून जितेंद्र आव्हाड यांची ओळख आहे. पुरोगामी विचारसरणीचे पुरस्कर्ते जितेंद्र आव्हाड अनेकदा आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांनी चर्चेत राहिलेत.
महाराष्ट्रातील दहीहंडी जगभरात पोहोचवण्यात जितेंद्र आव्हाड यांचा मोठा वाट आहे. जितेंद्र आव्हाड यानी मुंबई विद्यापीठातून मास्टर्स ऑफ लेबर स्टडी याचसोबत मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी देखील मिळवलीये आहे.
जितेंद्र आव्हाड यांना शरद हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे नेते आहेत. दरम्यान आज जितेंद्र आव्हाड यांची मंत्रीपदावर वर्णी लागल्यामुळे ठाण्यात 'एकनिष्ठेचे फळ' असं लिहलेले बॅनर्स देखील लावलेले पाहायला मिळालेत. दरम्यान स सर्व घडामोडी पाहण्यासाठी आई हवी होती अशी भावना जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना बोलून दाखवली.
जितेंद्र आव्हाड यांनी आज महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलीये.
WebTitle : jitendra awhad took oath as cabinet minister of maharashtra in thackeray ministry
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.