मुंबई : बांद्रा येथील म्हाडाच्या (MHADA) प्लॉटवर क्रिकेट अकादमी (cricket academy) सुरु करण्यावरून आता राजकीय वाद चांगलेच रंगलेत. तो प्लॉट ताब्यात घेण्याची महाराष्ट्र सरकारने (maharashtra government) तयारी दाखवली. पण महत्वाचा मुद्दा म्हणजे कित्येक वर्ष प्लॉट असूनही भारताचे माजी कर्णधार क्रिकेटपटू सुनील गावस्कर (sunil gavaskar) यांनी तिथे क्रिकेट अकादमी सुरु केली नाही. यावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra avhad) यांनी ट्विट करत एक इच्छा व्यक्त केली आहे. या ट्विटमध्ये आव्हाडांनी त्यांची खास आठवणही सांगितली आहे.
ट्विटमध्ये खास आठवणही
भारताचे माजी कर्णधार क्रिकेटपटू सुनील गावस्करांच्या विनंतीनुसार सरकारने तो प्लॉट त्यांच्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र त्या प्लॉटवर लवकरात लवकर अकादमी सुरु करण्याची इच्छा जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. यावेळी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी खास आठवणही सांगितली आहे.
संबंधित प्लॉट गावस्कर ट्रस्टकडेच
साधारण 31 वर्षांपूर्वी बांद्रयाचा भूखंड हा सुनील गावस्कर यांच्या ट्रस्टला देण्यात आला होता. रंगशारदा सभागृहाजवळ हा 21,348 चौरस फूट भूखंड आहे. परंतु अनेक वर्षे लोटली तरी गावस्कर ट्रस्टकडून तिथे कोणत्याही बांधकामाच्या हालचाली नव्हत्या. त्यामुळे डिसेंबरमध्ये प्राधिकरणाने राज्य सरकारला भूखंड परत घेण्यास सांगितला होता यावर महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) आणि ‘गावस्कर ट्रस्ट’ यांच्यात सरकारी पातळीवर चर्चा झाली. म्हाडाला तो प्लॉट परत घ्यायचा होता. पण चर्चेअंती आता गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी संबंधित प्लॉट गावस्कर ट्रस्टकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्विट करत काय म्हणाले आव्हाड?
“जर सुनिल गावस्कर नसता तर कदाचित त्याला आज देण्यात आलेला म्हाडाचा प्लॉट मी रद्द केला असता. ज्या दिवशी सुनिल गावस्कर फिलिप्स डिफ्रायटेस च्या चेंडूवरती त्रिफळाचीत झाला. त्या दिवसापासून जवळ-जवळ माझा क्रिकेट मधला इंटरेस्टच संपला. स्टेडियम मधून रडत बाहेर पडलो होतो…”
“गृहनिर्माण विभागाचा मंत्री म्हणून मी हा प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त तो सुनिल गावस्करसाठी बदलला. आतातरी सुनिल गावस्करने तिथे क्रिकेट अकादमी सुरु करावी एवढीच इच्छा”, असेही आव्हाड म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.