Koshyari_Danave 
महाराष्ट्र बातम्या

Ambadas Danave: "21 जून जगभरात 'गद्दार दिवस' साजरा व्हावा" दानवेंचं कोश्यारींना पत्र

संयुक्त राष्ट्रांकडे पाठपुरावा करा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक अजब मागणी करणार पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी एक खोचक मागणी केली असून यासाठी संयुक्त राष्ट्रांकडे पाठपुरावा करा, असं म्हटलं आहे. (June 21 should be observed as Traitor Day worldwide Ambadas Danave letter to Bhagat Singh Koshyari)

दानवेंनी कोश्यारींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, "जर गतवर्षी झालेल्या गद्दारीची दखल ३३ देशांनी घेतली होती, तर २१ जून रोजी जगभरात 'गद्दार दिवस' साजरा करण्यात यावा. या कांडात आपली भूमिका खूप महत्त्वाची राहिली आहे. आपल्यामुळं नावारूपाला आलेल्या या दिवसाला साजरा करण्यासाठी आपण आपल्या दिल्लीच्या पातशाहांमार्फत संयुक्त राष्ट्रांकडे पाठपुरावा करावा, मागणी करावी, हे माझे आपणास आवाहन आहे" (Latest Marathi News)

दानवेंनी कोश्यारींना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?

आपण महाराष्ट्राचे राज्यपाल असताना अनेकवेळा आपल्या भेटीगाठी झाल्या, आपण महाराष्ट्र असताना ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार वारंवार जाणीवपूर्वक त्रास देण्याचं काम अविरत चालू ठेवलं होतंच! ते कमी की काय म्हणून महाराष्ट्रात आपल्या दिल्लीच्या पातशाहच्या मार्गदर्शनाखाली सुर्याजी पिसाळ, खंडूजी घोरपडे यांच्या गद्दारीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात गद्दारीचं पीक फोफवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.

याची परिणीती २० जून २०२२ रोजी शिवसेना पक्षातून ४० आमदारांनी गद्दारी करुन बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं पाप केलं. ही गद्दीर जाणून घेण्यासाठी जगातील ३२-३३ देशांनी माहिती घेतली. (Marathi Tajya Batmya)

जर अशा गद्दारीची जगातील एवढ्या देशातील जनतेचं लक्ष वेधलं जात असेल तर हा दिवस जागतीक गद्दार दिन साजरा होऊ शकतो, तो व्हावा म्हणून आपण आपल्या दिल्लीच्या पातशहांमार्फत युनोकडं प्रयत्न करावेत, अशी आपणास विनंती करतो.

आपणास शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT