महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रातून निघालेला मोर्चा यशस्वी होतोच; केसीआर यांचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telagana CM K Chandrashekhar Rao) हे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Maharashtra CM Uddhav Thackeray) भेटीसाठी आज मुंबईत आले आहेत. या दोघांमध्येही तब्बल सव्वादोन तास खलबतं झाली आहेत. या भेटीवेळी खासदार संजय राऊत आणि दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता प्रकाश राज देखील उपस्थित होते. केंद्रातील भाजप सरकारविरोधात तिसरी आघाडी निर्माण करण्याचे संकेत नुकतेच केसीआर यांनी दिले होते. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी याचेच संकेत दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही हाच मुद्दा अधोरेखित करत भाजपच्या सूडाचं राजकारण संपलं पाहिजे, असं वक्तव्य केलंय. केसीआर आणि उद्धव ठाकरेंमध्ये झालेल्या बैठकीनंतर केसीआर यांनी बैठकीतील मुद्यांवर भाष्य केलंय.

यावेळी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी म्हटलंय की, आज एक सुरुवात झालीये आणि आम्ही थेट स्पष्टपणे सांगितलंय. आम्ही इतर नेत्यांशीही खुलेपणाने बोलू. कशाप्रकारे तिसऱ्या आघाडीची सुरुवात होईल, याबाबत आम्ही चर्चा करु. अत्यंत वाईट पद्धतीने केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहेत, यात काही शंकाच नाही. मात्र, केंद्र सरकारला ही नीती बदलावी लागेल, अन्यथा त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय.

पुढे ते म्हणाले की, आज देशाचं राजकारण, 75 वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरच्या अवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी मी महाराष्ट्रात आलोय. उद्धव ठाकरेंशी बोलून प्रसन्न वाटलं. अनेक मुद्यांवर चर्चा झाली आणि सहमतीही झाली. देशात सुधारणा आणण्यासाठी, देशाचा विकास करण्यासाठी चर्चा झाली. बऱ्यापैकी सर्व विषयांवर ही चर्चा झाली. येत्या काही दिवसांत आम्ही हैद्राबादमध्येही भेटू. महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने अनेक गोष्टी आमच्यासाठी सुकर झालेल्या आहेत. त्यामुळे ही दोस्ती निभवायची आहे.

दोन्ही राज्यांमध्ये सामायिक अशी 1000 किमीची बॉर्डर आहे. देशाच्या राजकारणात बदल झाला पाहिजे. देशात मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. देशाचं वातावरण खराब होता कामा नये. महाराष्ट्रातून निघालेला मोर्चा नेहमी यशस्वी होतो. शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंचा योद्धा जो आहे तो नेहमीच लढवय्या असतो. लोकशाहीसाठी आम्ही लढू इच्छितो. चांगली सुरुवात वर्षावरुन होतेय. ही खूप चांगली बाब आहे. याचा चांगला परिणाम येत्या काही दिवसातच दिसून येईल. मी त्यांना तेलंगणात येण्यासाठी आमंत्रण देतो. महाराष्ट्राकडून जे प्रेम मिळालंय. त्याबद्दल मी आभार मानतो, असंही त्यांनी म्हटलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 1.43 लाख गुंतवणूकदारांचे पैसे बुडणार; काय आहे प्रकरण?

तीन मैत्रिणींच्या गुलाबी प्रवासाची गोष्ट येणार प्रेक्षकांच्या भेटीस ; ट्रेलरने घातली प्रेक्षकांना भुरळ

AUS vs PAK 2nd ODI: DRS घेऊ का? मोहम्मद रिझवानचा प्रश्न अन् Adam Zampa ने अख्ख्या पाकिस्तान संघाचा केला 'पोपट', Video

Latest Maharashtra News Updates : मविआने अनेक प्रकल्पांचं काम थांबवलं - मोदी

Viral Video: ..अन् बाबा वाचले! मायक्रो सेकंदात वंदे भारत एक्स्प्रेस येऊन चिकटली; हृदयाचा ठोका चुकणारा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT