पुणे: समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषणे केल्याप्रकरणी कालीचरण महाराजला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. कालीचरण महाराजला पुणे पोलिसांनी आज अटक केली होती. कालीचरणला आज शिवाजीनगर न्यायलायात हजार करण्यात आलं होतं. त्याला कोर्टाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याआधीच छत्तीसगढमधील रायपुरमध्ये झालेल्या धर्मसंसदेत महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी यापूर्वीच अटक केली आहे. समस्त हिंदू आघाडी संघटनेतर्फे काही दिवसांपूर्वी नातुबाग मैदानात शिवप्रतापदिन कार्यक्रमात आयोजित केला होता. या कार्यक्रमात समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषणे केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांच्यासह समस्त हिंदू आघाडीचा कार्याध्यक्ष मिलींद रमाकांत एकबोटे, मोहनराव शेटे, दिपक बाबुलाल नागपुरे, कॅप्टन दिगेंद्रकुमार नंदकिशोर रमाकांत एकबोटे यांच्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कालीचरणने कार्यक्रमात अन्य धर्माच्या नागरिकांच्या भावना दुखावल्या जातील तसेच धार्मिक श्रध्दांचा अपमान समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे भाषण केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.