kamalabai ogale sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Din : '२ लाख सुनांची एकच आई' असं कमलाबाई ओगले यांना का म्हणतात ?

लग्न करून सासरी गेलेल्या नव्या नवरीला सासरच्यांचे खाण्या-पिण्याचे चोचले पुरवण्यासाठी कसरत करावी लागे.

नमिता धुरी

मुंबई : कोणत्याही पदार्थाची पाककृती सध्याच्या काळात एका क्लिकवर उपलब्ध होते. पण असा एक काळ होता जेव्हा पाककृती शिकण्यासाठी केवळ अनुभवी महिलांचीच मदत घ्यावी लागे.

लग्न करून सासरी गेलेल्या नव्या नवरीला सासरच्यांचे खाण्या-पिण्याचे चोचले पुरवण्यासाठी कसरत करावी लागे. अशा वेळी पाककृतीसाठी मार्गदर्शन म्हणून युट्यूब उपलब्ध नसे. शिवाय माहेरी आईला फोन करून माहिती घेण्याचीही सोय नव्हती. (kamalabai ogale ruchira recipe book famous maharashtrian recipe book)

अशा काळात कमलाबाई ओगले यांच्या रुचिरा या पुस्तकाने घराघरांतील सुनांना आधार दिला. सुरुवातीला फक्त मराठी पाककृतींसाठी प्रसिद्ध असलेलं हे पुस्तक हळूहळू स्वयंपाकघरातल्या विविध गरजांना पूरक ठरू लागलं. हेही वाचा - What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

कमलाबाईंचं शिक्षण एसएनडीटी विद्यापीठात फक्त चौथीपर्यंत झालं होतं. त्यांचा विवाह सांगलीतील ओगले कुटुंबात झाला. स्वयंपाकात त्या अगदी सुगरण होत्या. त्यांच्या कलेला प्रोत्साहन म्हणून त्यांच्या कुटुंबाने पाककृतींचं पुस्तक कमलाबाईंकडून लिहून घेतलं.

किर्लोस्कर प्रकाशनाच्या स्त्री सखी प्रकाशनाने प्रकाशित केलेलं पहिलं पुस्तक म्हणजे कमलाबाई ओगलेंचं रुचिरा. १९७०च्या सुमारास हे पुस्तक प्रकाशित झालं. ते विकलं जाईल याबद्दल प्रकाशकांना खात्री नव्हती.

पण प्रकाशनाच्या दिवशीच या पुस्तकाच्या २१०० प्रती विकल्या गेल्या. त्यानंतर प्री-प्रिंट ऑर्डर या योजनेत सवलतीच्या दरात १० हजार प्रती विकल्या गेल्या. पुस्तक पुन्हा-पुन्हा छापावे लागले.

या पुस्तकामुळे कमलाबाईंना विविध ठिकाणी परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. परदेशातूनही बोलावणी येऊ लागली. मराठीसोबतच तमिळ, पंजाबी, अशा विविध संस्कृतींतल्या पदार्थांचाही यात समावेश करण्यात आला.

एक पाऊल पुढे जाऊन पदार्थाची सजावट, उपयुक्त सूचना, आधुनिक साधनांची माहिती, अशा विविध गोष्टींचा समावेश या पुस्तकात करण्यात आला. पुस्तकाच्या दोन लाख प्रती खपल्यामुळे दोन लाख सुनांची एकच आई अशी ओळख कमलाबाई ओगलेंना मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT