वाशी येथील एका शाळेत जय श्रीराम च्या घोषणा दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आज मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगर येथील कपोल विद्यानिधी शाळेमध्ये अजान लावल्यामुळं वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना नमाज कसे पढायचे हे शिकवण्याचा प्रकार घडल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर पालकांच्या विरोधानंतर शाळेनं माफी मागितली आहे. (Kapol Vidyanidhi School in Mumbai played Azan amid religious controversy in Maharashtra )
गेल्या काही दिवासांपासून राज्यात जाती धर्मावरुन वाद सुरु आहे. अशातच मुंबई येथील कपोल विद्यानिधी शाळा धार्मिक वादाच्या भोवऱ्यात अडकली आहेत. शिवसेनेकडून शाळेवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.(Latest Marathi News)
आम्ही सर्व धर्माच्या प्रार्थना लावतो. असं स्पष्टीकरण शाळेनं दिलं आहे.(Latest Marathi News)
पालक आक्रमक, गरज काय अजान लावण्याची
शाळेच्या या भूमिकेनंतर पालक आक्रमक झाले आहेत. अजान लावण्याची गरज काय? अशी विचारणा पालक करत आहेत. हनुमान चालिसा का लावली नाही असही पालक विचारत आहेत.
शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या शाळेवर मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली. या संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून त्यावर कारवाई करण्याची मागणी देखील शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.