Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

झालेल्या चुका मान्य करून पुढे जा; एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना सल्ला

सकाळ डिजिटल टीम

'शिवसेना मजबूत असल्यामुळे आपण अनेक ठिकाणी विजयी खेचून आणू शकतो.'

कऱ्हाड (सातारा) : येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election 2022) जिंकण्याचे तंत्र पदाधिकाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. त्यासाठी गोळाबेरीज करावी लागली, तर तीही करा. अन्यथा पाडापाडीच्या राजकारणात आपणच आपला खड्डा खोदून बसू. आत्मपरीक्षण व आत्मचिंतन करत पुढे जा. सरकार म्हणून मुख्यमंत्री ठाकरे (Uddhav Thackeray) व मंत्र्यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोचवून शिवसैनिकांनी गावागावांत व घराघरांत शिवसेना (Shiv Sena) व शिवसैनिक निर्माण करावा, असे आवाहन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले.

पश्चिम महाराष्ट्र शिवसेना पदाधिकारी संवाद शिबिरात मंत्री शिंदे बोलत होते. पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), आमदार महेश शिंदे, अनिल बाबर, शिवसेना नेते दिवाकर रावते, सातारा- सांगलीचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे- पाटील (Nitin Banugade-Patil) आदी उपस्थित होते. मंत्री शिंदे म्हणाले, ‘‘पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यामुळे शिवसेना वाढवण्याची संधी शिवसैनिकांना आहे. सत्तेचा वापर शंभर टक्के समाजकारण व समाजसेवेसाठी करता येतो. झालेल्या चुका मान्य करून पुढे जा.’’

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, ‘‘शिवसेनेच्या काळात सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्याने राजकीय पार्श्वभूमी नसलेले अनेक जण सत्तेत गेले. शिवसेना मजबूत असल्यामुळे आपण अनेक ठिकाणी विजयी खेचून आणू शकतो. शिवसैनिकांनी निवडणुकीपुरते लोकांच्या संपर्कात राहून चालणार नाही. लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’’ मंत्री सामंत म्हणाले, ‘‘शिवसेना हाच पक्ष वंचित घटकाला न्याय देऊ शकतो. शिवसेनेने केलेले कार्य, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने घेतलेले निर्णय, राबवलेल्या योजना शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजेत.’’ मंत्री देसाई म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे धाडसाने पावले टाकून राज्यातील जनतेच्या हितासाठी निर्णय घेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वाढावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT