Kirit Somaiya esakal
महाराष्ट्र बातम्या

कऱ्हाडकरांनी अनुभवला पहाटेपासून सहा तासांचा 'High-Voltage' ड्रामा

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : पहाटे पाचपासून जुन्या कोयना पुलाकडे फिरायला जाणाऱ्यांची गर्दी नेहमीचीच असते. मात्र, आज तो सारा मार्ग मध्यरात्री तीननंतर अडविण्यात आला. शाहू चौकात पोलिसांचे (Karad police) बॅरिकेट्स लागले गेले. पोलिसांचा मोठा फौजफाटा शासकीय विश्रागृहाबाहेर धडकला. बंदोबस्तही लागला. काही कळायच्या आतच पहाटे फिरायला येणाऱ्यांनाही तिकडे फिरकण्यास मज्जाव केला गेला. लगेचच पाचला मोठ्या वाहनांचा ताफा थेट शासकीय विश्रामगृहात शिरला. त्या पाठापाठ माध्यमांचीही वाहनेही आली, मात्र ती बाहेर अडविण्यात आली. विश्रामगृहात पावणेपाचला भाजप नेते किरीट सोमय्यांना (BJP leader Kirit Somaiya) घेवून शिरलेला ताफ्यांचा हायहोल्टेज ड्रामा तब्बल सहा तासांनी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी संपला. भाजप नेते सोमय्या यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर ते मुंबईला रवाना झाले अन् त्या सगळ्या नाट्यावर पडदा पडला.

पहाटे पाचपासून जुन्या कोयना पुलाकडे फिरायला जाणाऱ्यांची गर्दी नेहमीचीच असते. मात्र, आज तो सारा मार्ग मध्यरात्री तीननंतर अडविण्यात आला.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर तीन दिवसांपासून भष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. सोमय्या यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वातावरण ढवळून निघालंय. मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी सोमय्या महालक्ष्मी रेल्वेने कोल्हापूरला निघाले होते. त्यांच्या मुंबईपासूनच्या प्रवासात सारे नाट्यमयरित्या घडत होते. मंत्री मुश्रीफ यांच्या समर्थकांनी सोमय्या यांना कोल्हापुरात आल्यास त्यांच्याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मज्जाव केला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांना कऱ्हाडच्या रेल्वे स्थानकावर पोलिसांनी ताब्यात घेतले. पहाटे साडेचारच्या सुमारास कोल्हापूरकडे जाताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तेथून कऱ्हाडच्या विश्रामगृहात तब्बल सहा तासांचा हायहोल्टेज ड्रामा झाला.

मुंबईहून सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरकडे रवाना झाले होते. मात्र, आज पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांना सातारा व कोल्हापूर पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या विनंतीला पहाटे पावणे पाचच्या सुमरास यश आले. सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेस मधून कऱ्हाडला उतरवले. पोलिसांनी कऱ्हाडच्या रेल्वे स्थानकावर दोनपेक्षाही पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. त्यात एसआरपीपएफचे जवानही होते. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यासह भाजपचे कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण होणार हे लक्षात येताच, पोलिसांनी तेथे क्षणाचीही विलंब न करता सोमय्या यांना थेट शासकीय विश्रामगृहाकडे आणले. तेथे पहाटे पाचपासून पोलिस प्रशासन मनधरणी करत होते.

कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यासह कोल्हापूर एलसीबीचे कर्मचारी येथे उपस्थित होते. जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपाधीक्षक रणजीत पाटील, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, एलसीबीचे किशोर धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्यासह त्यांचे पथक सोमय्या यांच्याशी चर्चेत सहभागी होते. सोमय्या व पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. ती चर्चा संपल्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे जाहीर केले. शासकीय विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही मोठा पोलिस बंदोबस्त होता. प्रत्येक ठिकाणी तपासणी होत होती. त्यातून पत्रकारांनाही जावे लागले.

नऊच्या सुमारास सोमय्या यांची पत्रकार परिषद सुरू झाली. त्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बेछुट आरोप केले. त्यानंतर बरोबर दहा वाजून दहा मिनिटांनी सोमय्या यांना स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करून देण्यात आली. त्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व प्रवक्ते भरत पाटील सोमय्या यांच्यासमवेत मुंबईपर्यंत गेले. त्यामुळे पहाटे साडेचारला सुरू झालेला सोमय्यांचा हायहोल्टेज ड्रामा सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी ते मुंबईला रवाना झाल्यानंतरच संपला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT