karjat jamkhed rohit pawar bjp amit shah ncp baramati nirmala sitharaman shital pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

भाजपच्या रडारवर 'पवार'? बारामती पाठोपाठ कर्जत जामखेड!

भाजपने शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आणण्यात पहिल्या टप्प्यात यश मिळवले. हे करत असताना शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ४० आमदारांसह १२ खासदार शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वापासून दूर करण्यातही भाजपला यश आलं.

शीतल पवार

राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग मोडून काढत शिवसेनेला सुरुंग लावत भाजपने शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आणण्यात पहिल्या टप्प्यात यश मिळवले. हे करत असताना शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ४० आमदारांसह १२ खासदार शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वापासून दूर करण्यातही भाजपला यश आलं. या प्रकरणात न्यायालयीन लढाई सुरू आहेच पण सध्यातरी शिवसेनेच्या अस्तित्वाचा संघर्ष सुरुय. या सगळ्यावरून पुन्हा एकदा भाजपच्या प्रादेशिक पक्षांबद्दलच्या रणनीतीची चर्चा सुरू झालीय. सेने पाठोपाठ भाजपच्या रडारवर असेल महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. भाजप राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना अडकवून ठेवण्याची रणनीती आखताना सध्या दिसतंय.

बारामती

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुणे दौऱ्यातल्या - 'अ' से अमेठी.. 'ब' से बारामतीच्या बाराखडीचा विसर पडण्याआधीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण खडकवासला दौऱ्यावर येत आहेत. आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात त्या खडकवासला येथील भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या घरी मुक्कामाला असतील. शिवाय त्यांच्या बैठकाही मतदारसंघातच आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यापूर्वीही भाजपचे केंद्रीय मंत्री पुणे शहर आणि जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले आहेत. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.

कर्जत जामखेड

सनी पवार नावाच्या मुलाला वैयक्तिक कारणातून झालेल्या मारहाणीला हिंदू-मुस्लिम स्वरूप आले आहे. यावर आमदार नितेश राणेंनी 'हिंदु' म्हणून नुकतीच भाजप कार्यालयातुन पत्रकार परिषद घेतली. सनीच्या मोबाईलवर नुपूर शर्माचा फोटो वगैरे. आज पवार यांच्या हल्ल्याचा निषेध नोंदवत आमदार नितेश राणेंनी इथे आंदोलन केलंय. तसेच भाजपचे धनगर नेते गोपीचंद पडळकर यांच्यासह राणे यांनी पवार यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. या मतदारसंघातून यापूर्वी राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांच्याकडून पराभूत झालेल्या राम शिंदेंना भाजपने अलीकडेच विधानपरिषदेवर घेतलंय.

राणे कुटुंबातील माजी खासदार निलेश राणेंची पत्नी प्रियांका कर्जतच्या निंबाळकर घराण्यातल्या, आता तिथं निलेश राणेंची पत्नी उभी राहील, अशीही एक शक्यता आहे. या शक्यतेचा विचार केला तर पारंपरिक मराठा-धनगर जातीय वादा पलीकडे जाऊन हिंदू-मुस्लिम वादाला महत्व आल्याचे चित्र सध्या दिसतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT