Almatti Dam Koyna Dam esakal
महाराष्ट्र बातम्या

Koyna Dam Update: महापुराची धास्ती! महाराष्ट्राचं 'आलमट्टी'वर तर कर्नाटक शासनाचं 'कोयने'वर लक्ष्य; दोन्ही धरणांत किती आहे साठा?

Koyna Dam & Almatti Dam Update: पाणलोट क्षेत्रात पावसाचा (Monsoon Rain) जोर कायम असल्यामुळे आलमट्टी धरणातील (Almatti Dam) पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

आलमट्टी धरणातील पाणीसाठा व तेथील पाण्याच्या विसर्गावर महाराष्ट्र शासनाचे लक्ष असते; तर महाराष्ट्रातील कोयना व अन्य धरणांतून होणाऱ्या विसर्गावर कर्नाटकचे लक्ष असते.

बेळगाव : पाणलोट क्षेत्रात पावसाचा (Monsoon Rain) जोर कायम असल्यामुळे आलमट्टी धरणातील (Almatti Dam) पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. २५ जुलै रोजी सकाळी आठ वाजता धरणातील एकूण पाणीसाठा ७१.८१४ टीएमसी इतका होता, तर जिवंत पाणीसाठा ५४.१९४ टीएमसी इतका होता, अशी माहिती कर्नाटक पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली आहे.

रविवारी आलमट्टी धरणात ५३.२४९ टीएमसी पाणीसाठा होता. दोन दिवसांत पाणीसाठ्यात सुमारे २० टीएमसीने वाढ झाली आहे. आलमट्टी धरणात वाहून येणाऱ्या पाण्याची आवकही वाढली आहे. पाटबंधारे खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार २५ जुलै रोजी धरणातील पाण्याची आवक तब्बल १ लाख १६ हजार २६३ क्युसेक इतकी होती.

तुलनेत धरणातून होणारा विसर्ग मात्र खूपच कमी आहे. धरणातून केवळ ८ हजार ८५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. आलमट्टी धरणाची क्षमता १२३.०८१ टीएमसी आहे. धरण ५० टक्‍क्यांपेक्षा अधिक भरले आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला, तर लवकरच धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.

आलमट्टी धरणातील पाणीसाठा व तेथील पाण्याच्या विसर्गावर महाराष्ट्र शासनाचे लक्ष असते; तर महाराष्ट्रातील कोयना व अन्य धरणांतून होणाऱ्या विसर्गावर कर्नाटकचे लक्ष असते. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. कृष्णेच्या उपनद्यांवरील धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत.

त्यामुळे त्या धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आलमट्टी धरणातील पाण्याची आवक वाढू शकते. त्यामुळे आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याची गरज निर्माण होते. गेल्या काही वर्षांपासून यासंदर्भात महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या पाटबंधारे खात्याने परस्पर समन्वय ठेवला आहे. गतवर्षी महाराष्ट्राच्या पाटबंधारे खात्याकडून आलमट्टी येथे एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती.

कर्नाटक-महाराष्ट्रामध्ये समन्वय

महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा, विसर्ग व आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग यामध्ये समन्वय आहे. सुसूत्रता आली आहे. यंदा मॉन्सून विलंबाने सुरू झाल्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्रातील धरणांनी तळ गाठला होता. दोन आठवड्यांपासून पाऊस सुरू झाला असून, दोन्ही राज्यांतील धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर नेमकी कोणती स्थिती उद्‍भवणार, हे पाहावे लागणार आहे.

कोयना धरणात ५८ टीएमसी साठा

पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. नवजा परिसरात आज अडीचशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, नवजा व महाबळेश्वरच्या पावसाने आज तीन हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा पार केला आहे. कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा ५८.८१ टीएमसी झाला असून, गेल्या २४ तासांत ५ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

काल रात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा परिसरात धो- धो पाऊस कोसळत असल्याने गेल्या २४ तासांत २५२ मिलिमीटर, कोयनानगर येथे १६२ मिलिमीटर आणि महाबळेश्वरला १८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा ५८.८१ टीएमसी झाला आहे.

काल सायंकाळी चार वाजता पायथा वीजगृहातून एक हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. आज तो विसर्ग कायम असून, मुसळधार पावसामुळे जलाशयात प्रतिसेकंद ६० हजार ३९६ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. आज पूर्व भागात संततधार पाऊस पडत आहे. मुसळधार पाऊस पडत असला, तरी नदीच्या पात्रांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT