KCR and Sharad Pawar  
महाराष्ट्र बातम्या

KCR : नगरमध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार! 'या' बड्या नेत्याला घेऊन 'बीआरएस'ची आगेकूच

सकाळ डिजिटल टीम

देशात लोकसभा निवडणूकीला कमी कालावधी राहिला असताना सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय पटलावर एका नव्या राजकीय पक्षाचा आणि नेत्याचा उदय होताना दिसतोय. या पक्षाचं नाव भारत राष्ट्र समिती आणि नेत्याचं नाव आहे के. द्रशेखर राव.

चंद्रशेखर रावांनी महराष्ट्राच्या राजकारणात जोरदार एंट्री केली आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्रातील एकेका मोठ्या नेत्याला गळाला लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. यामध्ये हर्षवर्धन जाधव, भगिरथ भालके या नेत्यांनी आधीच बीआरएस प्रवेश केला आहे. आता नगरचा एक मोठा नेता केसीआर यांच्या गळाला लगाला आहे. तर कोण आहे तो नेता, आणि बीआरएसच्या एंट्रीने महाराष्ट्राच्या राजकारणातली समीकरणं कशी बदलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारत राष्ट्र समितीचा देशपातळीवर विस्तार होत आहे. त्यामुळेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने, विधानसभेची तयारी सुरू असताना, महाराष्ट्राच्या राजकारणात उडी घेतली.

मराठवाड्यात सभा झाल्यानंतर नगर जिल्ह्यातही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणूनच की काय, त्यांच्या पक्षाने नगर जिल्ह्यात हातपाय पसरण्यास चांगलीच सुरुवात केल्याचे दिसून येतंय. नांदेड, औरंगाबादमध्ये विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बीआरएसच्या ताफ्यात प्रवेश केला.

त्यानंतर आता केसीआर यांच्या बीआरएसनं राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का द्यायला सुरूवात केली. कारण राष्ट्रवादीतले तीन बडे नेते पक्ष सोडायच्या तयारीत असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांत सुरू झाल्या. यामध्ये पहिलं नावं पुढे आलं ते, श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांचे. श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादीचे महत्वाचे मानले जाणारे नेते घन:श्याम शेलार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले, शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे, घनश्याम शेलार यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. केसीआर यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश केला. शेलार यांनी आतापर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी मग पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करत आता घनश्याम शेलार यांनी बीआरएसची वाट धरली आहे.

घनश्याम शेलार यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना विधानसभा निवडणुकीत कडवी झुंज दिली होती. केवळ 750 मतांनी घनश्याम शेलार यांचा पराभव झाला होता. यंदा राष्ट्रवादी त्यांना तिकीट देईल की नाही हे निश्चित नव्हते. राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप हे पुन्हा पक्षात सक्रिय झाल्याने शेलार यांच्या मनात अस्वस्थता होती. त्याच भावनेतून त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्याची चर्चा आहे. पण यामुळे भारत राष्ट्र समितीला नगर जिल्ह्यात घनश्याम शेलार यांच्या रुपाने तगडा शिलेदार मिळाला आहे.

तसेच कर्जत आणि पाथर्डी तालुक्यातील आणखी दोघेही बीआरएसच्या संपर्कात असल्याच्या चर्चा चालू आहेत. ते दोघेही शरद पवार यांचे विश्वासू असल्याचे सांगण्यात येतंय. दरम्यान घनश्याम शेलार यांची सोडचिठ्ठी ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी नगरच्या राजकारणातला मोठा धक्का मानला जात आहे.

भारत राष्ट्र समितीचा देशपातळीवर विस्तार होत आहे. पक्षाचे महाराष्ट्रातही सर्व शक्तिनिशी कार्य सुरू आहे. मराठवाड्यातील संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यात पक्षाचं संघटन उभारल्यानंतर आता केसीआर यांनी विदर्भाकडे आपला मोर्चा वळवला आहे. मुख्यमंत्री केसीआर हे संघभूमी आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरमध्ये बीआरएसचं राज्यातील पहिलं कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान केसीआर यांच्या बीआरएसने महाराष्ट्राच्या राजकारणात उडी घेतल्यानंतर आणखी कोणत्या कोणत्या पक्षांना धक्का बसणार, राज्यातल्या राजकारणाची समीकरणं कशी बदलणार हे पाहणं औत्सुक्याचं ठणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT