Khalapur Irshalwadi Landslide 
महाराष्ट्र बातम्या

Khalapur Irshalwadi Landslide: हेलिकॉप्टर तयार, पण.... ; CM एकनाथ शिंदेंनी सांगितली बचावकार्यातील आव्हानं

Sandip Kapde

Khalapur Irshalwadi Landslide: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडी येथे जाऊन दुर्घटनेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मदतकार्य सुरू असल्याचे सांगितले. रात्री झोपेत असताना अनेकांवर काळाने हल्ला केला. ढिगाऱ्यात अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मध्यरात्री झालेल्या अपघातानंतर बचावकार्य सुरू असून आतापर्यंत ४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

तसेच, एकूण 27 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे. या ठिकाणी अनेक बचाव पथके काम करत आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून इतर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

दुसरीकडे, अपघाताबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Khalapur Irshalwadi Landslide)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडीवर येथे दरड कोसळली आहे.  ४५ ते ४७ घरांची ती वाडी आहे. दरड कोसळल्यामुळे १६ ते १७ घरे मलब्याखाली आहेत. बचावकार्य सुरू आहे.

शिंदे म्हणाले, वरती कुठलही वाहन नेण्याची सोय नाही. त्यामुळे मॅन्युअली काम करण्यात येत आहेत. पूर्ण टीम याठिकाणी आहे. जेवढं लोकांना वाचवता तेवढा प्रयत्न करत आहोत. आकडा सध्या सांगता येत नाही पण १५ ते १६ लोक अजून मलब्याखाली असतील.

हेलिकॉप्टर तयार आहेत पण हवामानामुळे ते उड्डान करु शकत नाही. मी त्यांच्या सतत संपर्कात आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे, असे शिंदे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rashmi Shukla: महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप? रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी तर भाजपचा खोचक पलटवार...

IND vs PAK: ६ ओव्हरमध्ये ११९ धावा करूनही टीम इंडिया हरली! पाकिस्तानने ३० बॉल्समध्येच जिंकला सामना

IND vs NZ 3rd Test : एकच राडा! न्यूझीलंडची तक्रार, अम्पायरची Sarfaraz Khan ला ताकीद अन् रोहित शर्माचा सहकाऱ्याला फुल सपोर्ट

Diwali 2024: विदर्भात केली जाणारी 'सीतादही' नावाची पूजा नेमकं काय? पाहा व्हिडिओ

होऊ दे खर्च! मी मावशी झाले... १४ वर्षांनी आई झाली तेजस्विनी पंडितची बहीण, बाळासोबतचे फोटो शेअर करत म्हणाली-

SCROLL FOR NEXT