Khalapur Irshalwadi Landslide: महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खालापूर शहराजवळ अतिवृष्टीमुळे इर्शाळवाडी गावावर डोंगर कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 100 जणांची सुटका करण्यात आली आहे.
इर्शाळवाडी दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या दुर्घटनेत आदिवासींच्या घरांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी 30 हून अधिक कुटुंबे अडकली होती.
राज्याच्या काही भागात संततधार पाऊस पडत असताना, भारतीय हवामान विभागाने (IMD) रायगडसाठी "रेड अलर्ट" जारी केला आहे. या घटनेनंतर बचाव कार्यात मदत करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांना केले आहे.
रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी सांगितले की, ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून उपविभागीय अधिकारी आणि खोपोलीचे तहसीलदार यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
या घटनेची दखल घेत अमित शहांनी ट्विट केले आहे की, ''महाराष्ट्रातील रायगड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनाबाबत मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं केलं आहे.
NDRF च्या 4 टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि स्थानिक प्रशासनासह बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढणे आणि जखमींवर तातडीने उपचार करणे हे आमचे प्राधान्य आहे.''
मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून एकूण अनेक जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.