Khalapur Irshalwadi rescue operation 
महाराष्ट्र बातम्या

Khalapur Irshalwadi rescue operation: इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर ; बचावकार्याला पून्हा सुरुवात

Sandip Kapde

Khalapur Irshalwadi rescue operation : इर्शाळवाडीचा दुसरा दिवसही विषण्ण मनस्थितीत उगवला. ४० तासांच्या शोधकार्यानंतर काल सायंकाळपर्यंत सहा मृतदेह बचावपथकाच्या हाती लागले असून, मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ११० नागरिकांची ओळख पटली आहे. अजूनही ७० ते ८० नागरिकांचा शोध लागलेला नाही.

दरम्यान, राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.  

दुर्घटनास्थळ उंचावर असल्याने कोणतीही तांत्रिक साधने व आधुनिक यंत्रणा मदतीसाठी व शोधकार्य करण्यासाठी वापरता येत नाहीत. त्यात धो-धो पडणारा पाऊस, सर्वत्र झालेला चिखल व तसेच मातीच्या ढिगाऱ्यांमुळे शोधकार्यात अनेक अडचणी येत असल्याचे बचावकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सध्या एनडीआरएफ आणि टीटीआरएफचे सुमारे १०० हून अधिक प्रशिक्षित कर्मचारी वाडीवर तळ ठोकून आहेत. इतर पालिका, कंपन्या, सामाजिक संस्थांचे कर्मचारी वाडीवरून परत पाठवण्यात आले आहेत. उद्या (ता. २२) सकाळी सहानंतर पुन्हा एनडीआरएफमार्फत शोधमोहीम सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.  

आणखी सहा मृतदेह बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून कमल मधू भुतांब्रा (४३), कान्ही रवी वाघ (४५), हासी पांडुरंग पारधी (५०), मधु नामा भुतांब्रा (४५), पांडुरंग पारधी (६०), रवींद्र पदू वाघ (४६) अशी सहा जणांचे मृतदेह बाहेर काढले. दुर्घटनेत गुरुवारी १६ आणि शुक्रवारी ६ असे एकूण २२ मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. (latest marathi news)

‘सिडको’मार्फत होणार इर्शाळवाडीचे पुनर्वसन

दुर्घटनाग्रस्त भागातील नागरिकांच्या तात्पुरत्या निवास व्यवस्थेसाठी ६० कंटेनर मागविण्यात आले आहेत. ‘सिडको’च्या माध्यमातून या नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘‘ स्थानिक माहितीवरून या आदिवासी वाडीमध्ये एकूण ४८ कुटुंबे वास्तव्यास असून लोकसंख्या २२८ इतकी आहे. त्यातील सुमारे १७ ते १८ घरांवर दरड कोसळली आहे.

बचाव कार्यात ९८ व्यक्तींना वाचविण्यात यश आले आहे. २८८ पैकी उर्वरित १०९ लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. इर्शाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडग्रस्त ठिकाणांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही,’’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

SCROLL FOR NEXT