Khalapur Landslide Irshalwadi Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

Khalapur Landslide: 'माळीण'ची पुनरावृत्ती? खालापूरमध्ये वसाहतीवर दरड कोसळली; NDRF ची पथके रवाना

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाजवळील चौक गावापासून सहा किलोमीटर अंतरावर ही घटना घडलीय

सकाळ डिजिटल टीम

Khalapur Landslide Irshalwadi

मुंबई : रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याची घटना बुधवारी रात्री घडली. मुसळधार पाऊस आणि दुर्गम भाग असल्याने मदतकार्यात अडथळे येत असून एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

३० कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. मात्र, प्रशासनाकडून या वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही.

इर्शाळगडाच्या (Irshalgad Fort) पायथ्याशी आदिवासी पाडे आहेत. यातील एका आदिवासी पाड्यावर रात्री १२ च्या सुमारास दरड कोसळली. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाजवळील चौक गावापासून सहा किलोमीटर अंतरावर ही घटना घडलीय.

नेमके नुकसान किती झाले आहे, ढिगाऱ्याखाली किती जण अडकले आहेत याबाबत प्रशासनाच्यावतीने अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

'हिंदुस्तान टाइम्स' च्या वृत्तानुसार, आदिवासी पाड्यावर एकूण ६० घरे आहेत. यातील ३० कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मध्यरात्री ही दुर्घटना घडली आहे. खोपोलीचे तहसीलदार आणि अन्य अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.

"डोंगराळ भाग असल्याने घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी चालत जावं लागतंय. आमच्या पथकाला तिथे पोहोचण्यासाठी तब्बल अडीच तास लागले" असं एका अधिकाऱ्याने ‘HT’ला सांगितले आहे. दरम्यान, रायगडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नवी मुंबई आणि पनवेल येथील रुग्णालयांना अलर्ट जारी केला आहे.

माळीण, तळीये दुर्घटनेची पुनरावृत्ती?

२२ जुलै २०२१ रोजी महाड तालुक्यातील तळीये गाव अतिवृष्टी आणि दरड कोसळल्याने डोंगराखाली गाडले गेले होते. या दुर्घटनेत ८७ जणांचा बळी गेला होता. एकूण ६६ घरे नष्ट झाली होती.

तर ३० जुलै २०१४ रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण या गावावर डोंगरकडा कोसळला होता. यात ४४ घरे ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. दुर्घटनेत १५१ जणांचा मृत्यू झाला. खालापूरमध्येही या घटनांची पुनरावृत्ती झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

Ease of Doing Business: जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' अहवालात भारताची मोठी झेप; जाणून घ्या काय आहेत कारण?

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

SCROLL FOR NEXT