Shirdi Bus Accident esakal
महाराष्ट्र बातम्या

Shirdi Bus Accident: शिर्डीतील बस अपघाताची धक्कादायक माहिती 'सकाळ'च्या हाती; रस्ता सुरक्षा अभियान...

राज्याच्या रस्ता सुरक्षा अभियानाची पोलखोल

प्रशांत कांबळे :सकाळ वृत्तसेवा

मुंबई: नाशिक-शिर्डी महामार्गावर वावीजवळ झालेल्या गंभीर खासगी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातामध्ये राज्याच्या रस्ता सुरक्षा अभियानाची पोलखोल झाली आहे. सर्रास अनफिट वाहन रस्त्यांवर धावत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो आहे.

या अपघातातील ट्रक क्रमांक एमएच 48 टी 1295 या वाहनाचे फिटनेस 20 डिसेंबर रोजीच संपले असून, बस क्रमांक एमएच 04 एफके 2751 या वाहनाला पनवेल आरटीओ कार्यालयांतर्गत दंड करून ब्लॅक लिस्ट केल्याची माहिती शासनाच्या एम परिवहन एॅपवरून पुढे आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील गंभीर अपघाताची ही दुसरी घटना आहे. यापुर्वी 8 ऑक्टोंबर रोजी खासगी बसने ट्रेलरला दिलेल्या धडकेत 12 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यु झाला होता. त्यानंतर आता खासगी बस आणि ट्रकच्या अपघातामध्ये 10 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याच्या परिवहन विभागांवर पुन्हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या अपघातातील दोन्ही वाहनांमध्ये दोष असल्याचे शासनाच्या एम परिवहन अॅपवर स्पष्ट दिसून येत आहे, शिवाय ट्रॅक अनफिट म्हणजेच रस्त्यांवर चालवण्या योग्य नसतांनाही अनफीट वाहन सर्रास रस्त्यांवर धावतात कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्याच्या परिवहन विभागाचा रस्ता सुरक्षा अपघाताचे उद्घाटन 11 जानेवारी रोजी पार पाडले, ज्यामध्ये परिवहन आयुक्तांनी 5 वर्षांमध्येच 50 टक्के अपघात कमी करण्याचे आश्वासन दिले, त्या दिशेने सध्या पावले टाकल्यी जात असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे. मात्र, अभियानाच्या तिन दिवसानंतरच अनफिटच्या वाहतुकीमुळे झालेला गंभीर अपघात पुढे आल्यानंतर आता परिवहन विभागापुढील रस्ते अपघात रोखण्याचे आव्हाण वाढले आहे.

मोंन्टेकार्लो कंपनीच्या व्यवस्थापकाविरोधात गुन्हा...

सिन्नर शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या मोंटेकारलो कंपनीच्या व्यवस्थापक व कामावर देखरेख करणारे प्रतिनिधी, अपघात करणाऱ्या ट्रकचा चालक सखाराम तुकाराम पल्हाळ राहणार कुंदली, तालुका मंठा, जिल्हा जालना याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सोनवणे यांच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकास औरंगाबाद येथून अटक करण्यात आली आहे. सुरक्षिततेचे कुठलेही प्रयोजन न करता रस्ते बंद करून अपघात होईल अशी परिस्थिती निर्माण करण्यास कारणीभूत झाल्याप्रकरणी ठेकेदार कंपनी मोंन्टेकार्लोच्या व्यवस्थापकास आरोपी करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT