सक्तवसुली संचलनालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेहुण्यांवर कारवाई करत त्यांच्या सदनिका जप्त केल्या. ठाण्यातील निलंबरी प्रकल्पातील ११ फ्लॅट्सवर ईडीने धडक करवाई करत जवळपास साडेसहा कोटींच्या मालमत्तांवर टाच आणली आहे. थेट मुख्यमंत्र्यांनाच दणका दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ सुरू आहे. (Kirit Somaiya Alleges Sharad Pawar)
यावर शरद पवार यांनीही टीका केली. आता ईडी गावोगावी पोहोचली आहे, असं पवार म्हणाले. त्यानंतर किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन पवारांवर निशाणा साधला आणि पवार कुटुंबीयांचे साताऱ्यातील जरंडेश्नस साखर कारखान्याशी असलेले संबंध अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
अजित पवार आणि त्यांच्या बहिणींशी निगडीत व्यक्तींनी जरंडेश्वस साखर कारखान्यात मोठा भ्रष्टाचार केला. यावेळी शरद पवारांनीही अजित पवारांसोबत रडण्याचं नाटक केलं. मी या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश केला.
जवळपास २७ हजार शेतकऱ्यांकडून सर्वकाही काबीज केलं, मी आकडेवारी दिल्यानंतर पवारांची बोलती बंद झाली. पवारांनी त्याबद्दल बोलावं, असं सोमय्या यांनी म्हटलं. आधी शरद पवार छगन भुजबळांबद्दल अशाच प्रकारे बोलत होते. म्हणून मुद्दा कोण काय बोलतो यापेक्षा कागदपत्र काय बोलतात, असा प्रश्न असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं.
काय म्हणाले शरद पवार?
सर्व केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा देशापुढील सध्याचा महत्वाचा प्रश्न आहे. राजकीय सुडाच्या हेतूनं सत्ताधाऱ्यांना त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हातामध्ये घेण्यात आला आहे. स्पष्ट सांगायचं म्हणजे पाच दहा वर्षांपर्यंत ईडीचं नाव कोणाला माहिती नव्हतं. पण आता तर गावागावांमध्ये ईडी पोहोचली आहे. या सर्व यंत्रणांचा सध्या दुर्दैवानं गैरवापर सुरु आहे, असं पवार म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.