भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. मागील आठवड्यात ते कोकणात अनिल परब यांचं रिसॉर्ट तोडायला गेले होते. त्या ठिकाणी सोमय्यांना पोलिसांनी काही काळ ताब्यातही घेतलं. मात्र, कोकणात सोमय्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना थेट आव्हान दिलं होतं. (Kirit Somaiya Alleges Ajit Pawar over Jarandeshwar Sugar Factory)
एक एक माफियांना जेलमध्ये जावं लागणार आहे. अनिल परब, अजित पवार, हसन मुश्रीफ यांना कोणतं सर्टिफिकेट हवं आहे, हे शरद पवारांनी ठरवावं, असं सोमय्या म्हणाले. सुप्रिया सुळे म्हणतात, सोमय्यांना कसं कळतं की छापे पडणार आहेत. तर आत्ताच सांगतो, पुढच्या आठवड्यात तीन मंत्र्यांवर छापे पडणार आहेत, असं सोमय्यांनी म्हटलं. त्यानंतर या आठवड्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोमय्या तत्काळ दिल्लीला रवाना झाले आहे. या ठिकाणी ते काही केंद्रीय अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
बारा तासात राष्ट्रवादीचे दोन मंत्री कचाट्यात?
सोमय्यांनी बारा तासात राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना रडारवर घेतलं. जरडेश्वर साखर कारखाना कोर्टाने जप्त करायला सांगितल्याचं सोमय्या म्हणाले. त्यामुळे आता ईडी या साखर कारखान्यावर जप्ती आणणार असल्याचं म्हटलं जातंय. हा साखर कारखाना ईडीने २७ हजार शेतकऱ्यांच्या स्वाधीन करावा, अशी सोमय्यांनी ईडीला विनंती केली आहे.
याशिवाय सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावरही ट्वीट केलंय. हसन मुश्रीफ ग्रुपच्या १५८ कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी शुक्रवारी आयकर, कंपनी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची पुण्यात भेट घेणार आहे, असं सोमय्यांनी सांगितलं.
"अजित पवारांकडून 1200 कोटींचा घोटाळा, जप्तीच्या कारवाईला कोर्टाची मान्यता"
साताऱ्यामधील कोरेगाव परिसरातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याशी संबंधित जमीन, इमारत, प्लांट, मशीन अशा 65 कोटी 75 लाख रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचलनालयाने जप्ती आणली होती. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MMCB) गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई केल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं होतं.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Ajit Pawar) मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर ही जप्तीची कारवाई करण्यात आली होती. याबद्दल किरीट सोमय्यांनी नवी माहिती समोर आणली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.