Majhi Ladki Bahin Yojana form status online 
महाराष्ट्र बातम्या

Ladki Bahin Yojana Status Checking Process : तुमचा 'लाडकी बहीण'चा अर्ज मंजूर झाला की बाद? 'या' सोप्या पद्धतीने करा चेक

How to check Ladki Bahin Yojana form status online : या योजनेअंतर्गत राज्य सरकार राज्यातील गरीब आणि दुर्बल घटकातील महिलांना दरमहिना १५०० रुपये आर्थिक मदत देणार आहे.

रोहित कणसे

गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारने सुरू केलेली 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' चांगलीच चर्चेत आहे. या योजनेसाठी राज्याभरातून लाखो महिलांनी अर्ज केले आहेत. या योजनेअंतर्गत राज्य सरकार राज्यातील गरीब आणि दुर्बल घटकातील महिलांना दरमहिना १५०० रुपये आर्थिक मदत देणार आहे. मात्र तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी केलेला अर्ज मंजूर झाला की रद्द झाला हे कसं कळणार? तर याची काळजी करू नका. कारण आपण हे सोप्या पद्धतीने कसे तपासावे याबद्दल जाणून घेणार आहोत.

तुमचा अर्ज मंजूर झाली की नाही हे तपासण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला नारीशक्ती दूत (Narishakti Doot App) अॅप डाऊनलोड करावे लागेल. हे अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या अॅपमधून तुम्ही या योजनेचा फॉर्म देखील भरु शकतात.या अॅपवर तांत्रिक अडचणी येत असल्याने नवीन (https://ladakibahin.maharashtra.gov.in/) ही वेबसाइट देखील सुरु करण्यात आली आहे. या वेबसाइटवर जाऊन तुम्ही काही मिनीटांतच फॉर्म भरु शकता.

तुमच्या फॉर्मचे स्टेटस कसे चेक कराल?

सर्वप्रथम नारीशक्ती दूत अॅप उघडा आणि त्यामध्ये लाभार्थी महिलेचा मोबाईल नंबर टाका.

यानंतर तुम्ही तुमचे अकाउंट लॉग इन करा. अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल हा ओटीपी वेरिफाय करा.

लॉग इन केल्यानंतर मेन्यू मध्ये योजनांची सूची येईल, यामध्ये माझी लाडकी बहीण योजना निवडा.

 त्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज असा पर्याय येईल. त्यावर क्लिक करुन तुम्ही अर्जाचे स्टेट्‍स पाहू शकतात.

अर्ज उघडल्यावर तुम्हाला चार पर्याय पाहायला मिळतील. त्यात Verification done , IN pending To submit, Edit Form असे पर्याय दिले जातील.

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मंजूर झाला का?

  • जर इन पेंडिंग टू सबमीट (IN pending To submit) दाखवत असेल तर तुम्ही अर्ज भरला आहे परंतु तो पुनरावलोकनासाठी सबमिट केलेला नाही.

  • येथे अप्रुव्हड (Approved) असे दिसत असेल, तर तुमचा अर्ज स्विकारला गेला आहे.

  • इन रिव्ह्यूव (In Review) असे दिसत असेल तर तुमच्या फॉर्मचे मुल्यांकन केले जात आहे.

  • Rejected असे दिसत असेल तर तुमचे अर्ज स्वीकारले गेलेले नाही.

  • डिसअप्रुव्ह - कॅन एडीट अँड रिसबमीट (Disapprove- Can Edit And Resubmit) असे दिसत असल्यास तुमचे फॉर्म काही कारणांनी स्विकारले गेलेले नाही.त्यामुळे तो पुन्हा एकदा सबमिट करावा लागेल.

योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • आधार कार्ड

  • जन्म प्रमाणपत्र

  • पत्त्याचा पुरावा

  • वय प्रमाणपत्र

  • आय प्रमाण पत्र

  • शिधापत्रिका

  • पासपोर्ट आकाराचा फोटो

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आणि लाभ घेण्यासाठी पात्रता काय?

  • या योजनेसाठी केवळ मूळ महाराष्ट्रातील महिलाच पात्र आहेत

  • २१ ते ६५ वर्षे वयाच्या महिलाच या योजनेत अर्ज करू शकतात.

  • दुर्बल आणि गरीब कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

  • महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २५०००० रुपयांपेक्षा कमी असेल तरच ती या योजनेसाठी पात्र ठरेल.

  • केवळ विवाहित, घटस्फोटित, अविवाहित, विधवा, निराधार महिलांनाच योजनेचा लाभ घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT