Karuna Sharma News | Kolhapur Election News karuna munde
महाराष्ट्र बातम्या

कोल्हापूर उत्तरची निवडणूक रंगणार; करूणा शर्मा रिंगणात

अर्ज भरतेवेळी त्यांनी धनंजय मुंडें यांच्यावर घणाघाती टीका केली.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काल भाजप आणि काॅंग्रेस उमेदवारांनी अर्ज दाखल केला. करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी अर्ज दाखल केला. हा अर्ज भरतेवेळी त्यांनी धनंजय मुंडें यांच्यावर घणाघाती टीका केली. माझ्याजवळ कायदेशीर पुरावे आहेत ते सगळ्यांना लवकरच समजेल अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. शिवशक्ती या नवीन पक्षाची घोषणा त्यांनी केलीयं.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. करूणा शर्मा यांच्या नावाबाबत तांत्रिक अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबात कायदेशीर पुरावे असल्याचे करूणा शर्मा यांनी म्हटलयं.

धनंजय मुंडें यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या, तांत्रिक अडचण माझ्या पतीच्या कागदपत्रात आहे. ६ मुले आणि अनेक पत्नी लपवण्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. पण माझ्या कागदपत्रात काहीच तांत्रिक अडचणी येणार नाहीत. मी ब्रम्हाकुमारींना मानते. आज गुरुवार मुहुर्ताचा दिवस होता म्हणून मी अर्ज भरल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

कोल्हापूर उत्तरमधील (Kolhapur Election) पोटनिवडणुकीत करूणा शर्मा याच त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार असतील. मागील काही दिवसांपासून पक्षातर्फे कोण उमेदवार असणार आहे, यावर विचार सुरू होता. जर आत्ता माझ्याकडे इतकी ताकद आहे तर मग २०२४ ला का निवडणुक लढवू शकत नाही. त्यामुळे २०२४ ला धनंजय मुंडे विरुद्ध, करुणा धनंजय मुंडे अशी लढत १०० टक्के होणार आहे, असे आव्हानच त्यांनी दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT