deepak kesarkar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Konkan Politics: मी लोकसभा नाही तर फक्त विधानसभाच लढवणार; दीपक केसरकर आक्रमक!

CD

सावंतवाडी मतदारसंघात शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत नसल्याचे चित्र उभे करण्यात आले. मी आमदारकी सोडून खासदारकी लढविणार, असाही प्रचार काहींनी केला. हा गैरसमज दूर होण्यासाठी मी २०२४ ची विधानसभाच लढविणार आहे, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यांनी मतदारसंघातील विकासकामे पूर्ण झाल्याचा दावाही केला.

ते म्हणाले, ‘‘सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांतील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत नसल्याचे चित्र उभे करण्यात आले; मात्र आम्ही गाव पॅनेल म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो. खानोली व मातोंडमध्ये मैत्रिपूर्ण लढत झाली. त्यामुळे आमच्याकडे ग्रामपंचायत नाही, असा प्रचार करणे चुकीचे आहे. मी आमदारकी नाही तर खासदारकी लढवणार, असाही प्रचार काहींकडून करण्यात येत आहे; मात्र त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी मी २०२४ मध्ये आमदारकीच लढवणार आहे.

पक्षाकडून खासदारकीसाठी या मतदारसंघातून जो कोणी उमेदवार असेल, त्याला ५० हजारांचे मताधिक्य देणार आहे. ते म्हणाले, ‘‘राज्याच्या शिक्षण विभागात मोठे बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिक्षणामध्ये राज्य पुढील वर्षी प्रथम क्रमांकावर असेल. राज्य सरकारने लाखांहून अधिक सरकारी नोकर भरती केली. राज्यात ६१ हजार शिक्षकांना टप्पा अनुदानावर आणले. पुढच्या काळात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

लवकरच ‘माझी शाळा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. पोषण आहारामध्ये बदल केला असून, आहारामध्ये अंडी असतील. मुलांना वाचन, स्वच्छतेबाबत आवड निर्माण व्हावी, यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. शाळांमध्ये किचन गार्डनचा प्रयोगही होणार आहे. मराठा समाज बांधवांना आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे

परंतु सर्वोच्च न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळण्यासाठी मराठा बांधवांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारला डाटा मिळण्यासाठी सहकार्य करावे. बेळगाव-वेंगुर्ले रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे. लवकरात लवकर रस्त्याचे काम हाती घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मतदारसंघातील अन्य विकासकामांवरही मी लक्ष ठेवून आहे.’’

त्यांना मानधन देणार
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होऊ नये, म्हणून राज्यातील शाळांमध्ये नियुक्त निवृत्त शिक्षकांना मानधन मिळाले नसल्याबाबत केसरकर यांचे लक्ष वेधले असता, संबंधित शिक्षकांना तत्काळ मानधन देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: “आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील”; CM शिंदेंची घोषणा

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Champions Trophy 2025: झुकेगा नहीं साला... म्हणत होते, पण BCCI समोर पाकिस्तानची शरणागती, भारताचे सामने 'या' देशात

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT