Koyna Dam Electricity esakal
महाराष्ट्र बातम्या

Koyna Dam Update : मोठा दिलासा! आपत्कालीन परिस्थितीवर मात करत कोयना धरणातून तब्बल 13.536 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती

सकाळ डिजिटल टीम

गतवर्षी सिंचनासाठी सोडलेल्या ४.२६ टीएमसी पाण्यावर १२.८५२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती.

चिपळूण : कोयना धरण (Koyna Dam) तांत्रिक जलवर्षाच्या पहिल्या ४५ दिवसांत प्रचंड पाणीटंचाई व आपत्कालीन परिस्थितीवर मात करत तसेच अनेक दिवस तब्बल १००० मेगावॅट क्षमतेचा कोयना चौथा जलविद्युत निर्मिती (Electricity) टप्पा बंद असतानादेखील आत्तापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत १३.५३६ दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे.

पश्चिम वीजनिर्मिती ५.७८ तर पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या २.७७ अशा एकूण ८.५५ टीएमसी पाण्यावर २६३.१८८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. नव्याने सुरू झालेल्या या तांत्रिक जलवर्षात पहिल्या ४५ दिवसांत कोयना जलविद्युत प्रकल्पात (Koyna Hydroelectric Project) पश्चिमेकडे ५.७८ टीएमसी पाण्यावर २५५.७०७ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली.

गतवर्षी ५.२७ टीएमसीवर २३६.८०८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. या वेळी तुलनात्मक पश्चिमेकडे ०.५१ टीएमसी पाणीवापर जास्त झाल्याने १८.८९९ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती जास्त झाली आहे. पूर्वेकडे सिंचनासाठी सोडलेल्या पाण्यावर कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते.

सिंचनासाठी सोडलेल्या २.७७ टीएमसी पाण्यावर ७.४८१ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी सिंचनासाठी सोडलेल्या ४.२६ टीएमसी पाण्यावर १२.८५२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी १.४९ टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने ५.३७१ दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे.

चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता आत्तापर्यंत एकूण ८.५५ टीएमसी पाण्यावर २६३.१८८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. त्याचवेळी गतवर्षी ९.५३ टीएमसी पाण्यावर २४९.६५२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती.

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एकूण ०.९८ टीएमसी पाणीवापर कमी झाला असला तरी पश्चिमेकडे जादा पाणीवापर झाल्याने यातून १३.५३६ दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे. पश्चिम वीजनिर्मितीसाठी वर्षभरात ६७.५० टीएमसी पाणी लवादाचा आरक्षित कोटा आहे.

पाणीटंचाईच्या काळात एकीकडे सिंचनासाठी काटकसरीने पाणीवापर करताना दुसरीकडे अशा आव्हानात्मक परिस्थितीतही वीजनिर्मितीची वाटचाल समाधानकारक आहे. धरण निर्मितीनंतर पहिल्यांदाच २०२१ मध्ये ८२.६४ टीएमसी पाणी पश्चिम वीजनिर्मितीसाठी वापरले तर गतवर्षी सिंचनासाठी ३६.०५ टीएमसी पाणीवापर झाला.

- संजय चोपडे, मुख्य अभियंता महानिर्मिती पोफळी

‘कोयना’त २७.२७ टीएमसी पाणीसाठा

कोयना धरणातील एकूण १०५ टीएमसी साठ्यापैकी २७.२७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर, आलमट्टी धरणातील एकूण १२३ टीएमसी पैकी २६.९३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या दोन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे हळू हळू पाणीसाठा वाढत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

Pitru Paksha 2024 : रक्षाविसर्जन, पिंडदान, पितृशांतीसाठी यमराजांनी कावळ्यालाच का दिला बहुमान?

Vivek Oberoi : "माझं पहिलं प्रेम कॅन्सरमुळे गमावलं" ; पूर्वायुष्यावर भरभरून बोलला विवेक, म्हणाला- "मी कधीच धोका..."

SCROLL FOR NEXT