Laxman Hake sakal
महाराष्ट्र बातम्या

Laxman Hake: कुणबी अन् मराठा एकच म्हणणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा - लक्ष्मण हाके

सकाळ वृत्तसेवा

Manoj Jarange Patil: राज्यात चारशेहून अधिक जाती ओबीसी समाजामध्ये मोडतात. जरांगे यांच्याकडून ओबीसी आरक्षणात घुसखोरी केली जात आहे. राज्यातील प्रस्थापितांनी मनोज जरांगेना समोर केले आहे. संविधानात आरक्षणाचे धोरण ठरलेले असून दुय्यम वागणूक मिळालेल्या समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आरक्षण लागू केले आहे.

औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती बी. एच. मार्लपल्ली यांनी सांगितले आहे की कुणबी आणि मराठा एक म्हणणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा आहे. यासाठीच ओबीसी आरक्षण बचाओ जन आक्रोश यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन जाणार असून ओबीसी समाजाची जागृकता करणार असल्याचे मत ओबीसी नेते आणि आंदोलनकर्ते प्रा.लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आज (ता. २४) आष्टीतील विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

यावेळी तालुक्यातील ओबीसी नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. हाके म्हणाले की, मनोज जरांगे यांच उपोषण बेकायदेशीर व घटनाबाह्य असून आंदोलनाच्या माध्यमातून घटनात्मक चौकट उध्वस्त करण्याचा डाव आहे. आरक्षण मागणारा लाजिरवाणा, शोषित असतो, बघून घेईन म्हणणारा तसेच मुख्यमंत्री व शासन व्यवस्था वेठीस धरणारा मागास असू शकतो का असा प्रश्न हाके यांनी उपस्थित केला.

सरकार सत्यापासून दूर पळालं तर जरांगे नावाचं भूत तुमच्या मानगुटीवर बसेल. तुमचा घात करेल व तोंड काळ करण्याची वेळ तुमच्यावर येईल अशी जहरी टीका प्रा. लक्ष्मण हाके यांनी बोलताना केली. यामुळेच गावगाड्यातील ओबीसी, अठरा पगड जाती जागे होऊन रस्त्यावर उतरत आहेत. छोटे-छोटे समाज एकत्र झाली तर राजकारण विसरून जायची वेळ राज्यकर्त्यांवर येईल असेही हाके यांनी सांगितले.

जरांगे यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून पंचायत राज मधील ओबीसींच प्रतिनिधित्व संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलनकर्ते आमदारकी,खासदारकी व मुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्व टक्केवारीवर बोलायला तयार नाहीत. यशवंतराव चव्हाण पासून आज पर्यंत हेच मेरीट सेट आहे. यामुळे ही लढाई आरक्षण गरजवंतांची नसून वर्चस्वासाठीची आहे अशी टीका प्रा.हाके यांनी केली.

राज्यात मराठा समाज हा शासक, पाटील, मालक, जागीरदार, वतनदार, आमदार, खासदार व कारखानदार आहे. संविधानात सामाजिक अपंग असणाऱ्या समाजाला आरक्षणाची मुभा दिलेली आहे. मराठा समाज आरक्षणाच्या निकषात बसत नाही. ओबीसी विरोधात षडयंत्र करण्यात मराठा आमदार, खासदार व नेत्यांचा हात असल्याचा आरोप प्रा.हाके यांनी यावेळी केला.

सन 1994 व 2024 हे ओबीसीच्या इतिहासातील सुवर्ण पान आहेत. ओबीसी आरक्षण बचाव व जन आक्रोश यात्रेला महाराष्ट्रात भरपूर प्रतिसाद मिळत असून नवे पर्व ओबीसी सर्व हिच घोषणा यानिमित्ताने दिली जात आहे.

ओबीसी आरक्षणाची लढाई फार मोठी आहे. ही सुरुवात असून आम्ही ओबीसींच्या हक्क, अधिकार, स्वातंत्र्य, न्यायाची, स्वाभिमानाची व संविधानाला अपेक्षित असलेली लढाई लढू आणि फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र काय आहे हे येणाऱ्या काळात दाखवून देऊ असा इशारा देखील प्रा.लक्ष्मण हाके यांनी यावेळी बोलताना दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT